ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्ह्यातील गांजा अंमली पदार्थांची विक्री करणा-या गुन्हेगारांवर धडक कार्यवाही

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

  वर्धा जिल्ह्यात सुरू असलेल्या गांजा अंमली पदार्थांची विक्रीमुळे सामान्य जनतेवर त्यांचा विपरीत परीणाम होवुन, तरूण वर्ग नशेच्या आहारी जात असल्याने, त्यावर अंकुश लावण्याकरीता श्री. अनुराग जैन पोलीस अधीक्षक वर्धा यांनी विशेष मोहिम राबवुन, दि. 07/07/2025 रोजी त्यांचे पथकास मिळालेल्या गोपणीय माहितीवरून, अंमली पदार्थांची विक्री करणारे गुन्हेगार नामे 1) प्रणाली श्रीकांत भिसे उर्फ प्रणाली धिरज लेन्डे, वय 25 वर्ष, रा. वार्ड नं. 01 गजानन नगर वर्धा, 2) मयुर गजानन नाकाडे, वय 24 वर्ष, रा. हनुमानगड गिरीपेठ पिपरी मेघे वर्धा 3) रविंद्रसिंग उर्फ कालु लखनसिंग जुनी रा. गोसावी नगर बुट्टीबोरी यांचेवर एन.डि.पी.एस. कायद्यान्वये कार्यवाही करून, निव्वळ 2.556 किलोग्रॅम गांजा अंमली पदार्थसह जु.कि. 2,12,940 रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन, सदर गुन्हेगारांविरूध्द पो.स्टे. रामनगर येथे एन.डि.पी.एस. कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला. फरार आरोपीचा स्था.गु.शा. वर्धाचे पथकातर्फे शोध घेणे सुरू आहे.

  वर्धा पोलीस अधीक्षकांतर्फे अंमली पदार्थ विक्रीच्या विरोधात राबविलेल्या विशेष मोहिमेदरम्यान अंमली पदार्थांची विक्री करणा-या 19 गुन्हेगारांवर एन.डि.पी.एस. कायद्यान्वये कार्यवाही करण्यात आली असुन, 28 किलोग्रॅम अंमली पदार्थ जु.कि. 14,07,870 रू चा मुद्देमालासह जप्त करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षकांतर्फे सतत होणा-या धडक कार्यवाहीमुळे गांजा अंमली पदार्थांची विक्री करणा-या गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे. पोलीस अधीक्षकातर्फे जनतेस आव्हान करण्यात येते कि, वर्धा जिल्हा परीसरामध्ये अंमली पदार्थांची विक्री करणा-या गुन्हेगारांबाबत माहिती देवुन या मोहिमेस सहकार्य करावे. पोलीस विभागातर्फे माहिती देणा-याचे नाव गोपणीय ठेवुन, अंमली पदार्थांची विक्री करणा-या गुन्हेगारांवर कार्यवाही करण्यात येईल.

  सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक श्री. अनुराग जैन यांचे निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा जि. वर्धा चे पोलीस निरीक्षक श्री. विनोद चौधरी, पो.उपनि. उमाकांत राठोड, प्रकाश लसुंते, पो.अं. नरेंद्र पाराशर, अरविंद येनुरकर, रोशन निंबोळकर, निलीमा उमक, रवि पुरोहित, अक्षय राऊत, मिथुन जिचकार, मुकेश ढोके सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा व फॉरेन्सिक विभागाचे स.फौ. अनिल साटोणे व पो.हवा. मंगेश धामंदे यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये