ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

प्रवासादरम्यान दागिन्यांची चोरी

संपूर्ण मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 फिर्यादी नामे मंगला राधेशाम मडाची वय 35 वर्ष रा. डोंगरगाव ता. तरोडा जि. गोंदीया या पती व मुलासह सेवाग्राम रेल्वे स्टेशन येथुन ऑटोने वर्धा बस स्थानकडे येत असतांना चार अनोळखी महिलांनी प्रवासा दरम्यान फिर्यादीच्या हॅन्डवेंगमध्ये ठेऊन असलेले सोन्याचे 16 ग्रॅम वजनाचे कि. 30,000/रू चे चोरून नेले अशा फिर्यादीचे लेखी रिपोर्ट वरून पोलीस ठाणे वर्धा शहर येथे दिनांक 14/04/2016 रोजी अप.क. 789/16 कलम 379,34 भा.द.वी. अन्वये 04 अज्ञात महिलांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

सदर गुन्हयाचे तपास पो.हवा. प्रमोद जांभुळकर ब.क 617 यांनी केलेला असुन सदर गुन्हयांत आरोपी नामे क 1) सौ. सविता संजय लोंढे क 2) सौ. दिपा खंडारे 3) कु. सपना सुरपाम सर्व रा. पुल फैल, वर्धा यांना सदर गुन्हयात आरोपीचे ताब्यातुन गुन्हयात चोरी गेलेला मु‌द्देमाल सोन्याचे 16 ग्रॅम वजनाचे कि. 30,000/रू जप्त करण्यात आला व आरोपीविरूध्द पुरावा गोळा करून दोषारोपपत्र मा. न्यायालयात न्यायप्रवीष्ट करण्यात आलेले होते.

सदर गुन्हयात पैरवी अधिकारी पो.हवा. बंडु डडमल ब.क. 803 यांनी दोषसिध्दी मिळणेकरीता मदत केलेली आहे. सहाय्यक सरकारी अभियोक्ता सौ. ज्योती लकडे यांनी युक्तीवाद केलेला आहे. तसेच मा. मुख्य न्यायदंडाधिकारी, श्रीमती जि. व्ही. जांगडे यांनी पुराव्याचे आधारावर आरोपी सौ. सविता संजय लोंढे यास कोर्ट उठेपर्यंत शिक्षा व 5000/- रू दंड, दंड न भरल्यास 07 दिवस साधा कारावास शिक्षा सुनावली आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये