ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आषाढी एकादशी निमित्त शहारात सर्वत्र विठ्ठलमय वातावरण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 दि.०६/०७/२०२५ रविवार ला आषाढी एकादशी निमित्त शहारात सर्वत्र विठ्ठलमय वातावरण निर्माण झाले होते.शहारातील जुनीवस्ती म्हणून प्रसिद्ध असलेला स्वामी विवेकानंद वार्डातील नव्याने पुनर्निर्माण केलेले श्री विठ्ठल मंदिरात वर्षपुर्ती सोहळा म्हणून हभप रुपेश महाराज तळवडेकर यांचा भागवत सप्ताह सुरू होता.एकादशीला त्याची सांगता करण्यासाठी वारकरी पालखी दिंडी काढण्यात आली होती.तसेच वणानदीतिरी विदर्भातील मोठी अशी उभी असलेली श्री विठ्ठलाच्या मुर्तीचे दर्शनाला भक्तांची गर्दी झाली होती.त्यातच गुरुपौर्णिमा महोत्सव निमित्त शहरातून संत भिकाराम महाराज भक्तांनी हिंगणघाट ते आष्टा पर्यंत वाजतगाजत पायदळ दिंडी काढली होती.अशाप्रकारे शहारात सर्वत्र भक्तीमय वातावरण निर्माण झालेले होते.यासर्व वारकरी भक्तांची शिवसेना परीवार हिंगणघाट तर्फे ठिकठिकाणी फळ, फराळी चिवडा व चहापाणी व्यवस्था करण्यात आली होती.

वं.बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या २० टक्के राजकारण व ८० टक्के समाजकारण या विचारावर चालणारा शिवसेना पक्षाचे मुख्यनेते व महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री मा.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांनी ज्या पद्धतीने पंढरपूर येथील वारकरी भक्तांची दरवर्षी काळजी घेत आहेत.त्याचप्रमाणे येथे शहरात सुध्दा त्यांच्या आदेशानुसार संपर्कप्रमुख श्री दिक्षित साहेब व जिल्हाप्रमुख राजेशभाऊ सराफ,शुभांगीताई ठमेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभासंघटक श्री राजेश हिंगमिरे व तालुकाप्रमुख अमित गावंडे यांच्या नेतृत्वाखाली सौ.सुनिताताई तांबोळी शहरप्रमुख,अमित काळे शहरसंघटक,रजनीताई गोस्वामी शहरसमन्वयिका,झोरेताई,गुंफाताई रोठे,सतीशभाऊ तांबोळी,दिनेश काटकर,अक्षय निकम,मंगेश लोखंडे,अमोल देशपांडे व इतर शिवसैनिक यांनी उपस्थित राहून वाटप करण्यात योगदान दिले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये