ब्रह्मपुरी तालुक्यात अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती
ब्रह्मपुरी वडसा मार्ग बंद

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
चंद्रपूर जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून ब्रह्मपुरी तालुक्यात दोन-तीन दिवसापासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे भुती नाल्याला पूर आला असून ब्रह्मपुरी किंवा वडसा येथे जाण्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून भूती नाल्यावर बांधण्यात आलेल्या बोरगाव येथील कोल्हापुरी बंधाऱ्यावरून नागरिक ये-जा करीत होते. सध्या स्थितीत त्या बंधार्यावरून सुद्धा पावसाचे पाणी वाहत असल्यामुळे ब्रह्मपुरी वडसा मार्ग बंद झाला आहे.
तसेच ब्रह्मपुरी शहरामध्ये अनेक ठिकाणी गटर लाईनचे काम केले असल्यामुळे जागोजागी पाईपलाईन खोदलेल्या ठिकाणी गाड्या फसत आहेत अनेक भागात नागरिकांना पायी चालणे सुद्धा कठीण झाले आहे. संजय सरोवराचे पाणी गोसेखुर्द धरणामध्ये सोडल्याने गोसीखुर्द धरणाचे 33 दरवाजे अर्धा मीटरने उघडल्याने तालुक्यात पूर परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे