वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनापावसाळ्यात रेन कोट, काठी, शूज, बॅटरी साहित्य त्वरित द्या
वनरक्षक वनपाल संघटनेची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
वन विभागाच्या वन रक्षक, वनपाल, वन कर्मचाऱ्यांना पावसाळ्याच्या दिवसात रेन कोट, शूज, काठी, बॅटरी इत्यादी साहित्य देण्यात आले तर जंगलात गस्त घालत असताना पावसाळ्याच्या दिवसात जंगलाचे संरक्षण व संवर्धन चांगल्या प्रकारेकरता येईल, तसेच वनरक्षक वनपाल कर्मचारी यांच्याजवळ असलेले शासकिय दस्तऐवज पावसामुळे ओले होणार नाही.
गेल्या दोन वर्षांपासून अशा प्रकारची मागणी वनरक्षक वनपाल संघटना करीत आहे, मात्र अद्याप पावतो साहित्य मिळाले नाही, तरी आता पावसाळा सुरु झाला असून आता तरी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षाच्या दृष्टीने तात्काळ साहित्य देण्यात यावे.
अशी मागणी वनरक्षक वनपाल संघटनेचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष गजानन पोटे यांनी मा. उप वन संरक्षक (प्रादेशिक) बुलढाणा यांच्याकडे 7 जुलै रोजी निवेदन देऊन केली आहे