ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मार्कंडेश्वर मंदिर व उत्तर वाहिनी वैनगंगा नदीला १०८ परिक्रमा सुरू करणार 

संत मुरलीधर महाराज यांनी चंद्रपूर जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे दिली माहिती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार

विदर्भाची कशी म्हणून ओळख असलेले तालुका मुख्यालयापासून अगदी जवळच असलेले मार्कंडेश्वर मंदिराचे जिर्णोद्धार काम गेल्या दहा वर्षांपासून रेंगाळले होते ते काम सुरू व्हावे म्हणून संत मुरलीधर महाराज यांच्या द्वारा मोर्चे उपोषण केल्याने अखेर एक वर्षापूर्वी काम सुरू झाले मात्र ते काम अद्यापही संथ गतीने सुरु आहे. त्या कामाला गती यावी म्हणून प्रशासनाचे, भारतीय पुरातत्व विभागाचे लक्ष वेधण्यासाठी संत मुरलीधर महाराज हे २१ जुलै पासून मार्कंडेश्वर देवस्थान व उत्तर वाहिनी वैनगंगा नदीला १०८ वेळा परिक्रमा करणार आहेत त्यासाठी ०८ जुलै रोजी चंद्रपूर जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे माहिती दिली आहे. सदर निवेदन चंद्रपूर येथील निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हादंडाधिकारी डी. एस. कुंभार यांना देण्यात आले

      प. पू. श्री. मुर्लीधर महाराज यांच्या सह श्री मार्कंडेश्वर जिर्णोध्धार समिती, स्थानिक सरपंच, व समस्त गावकरी व भक्तगण यांनी 15/06/2025 रोजी सकाळी १.०० वाजता मार्कंडेश्वर देवस्थान येथे भेट दिले असता तेथे 15 कारागीर कार्यरत असल्याचे आढळले. आम्ही सर्व त्यांच्याशी चर्चा करून मंदिराच्या कामाची स्थिती जाणून घेतली आहे, महोदया, यामध्ये आणखी काही कारागीर यांची संख्या वाढवावी आणि मंदिराच्या कामाला गती मार्कंडेश्वरदेवस्थान मंदिराचे कार्य कधी बंद न होता असेच सतत अविरत सुरु राहावे व पूर्ण व्हावे. यासाठी प.पू. श्री. मुर्लीधर महाराज यांच्या नेतृत्वात 21 जुलाई पासून संपूर्ण उत्तर वाहिनी वैनगंगा नदीला 108 परिक्रमा समस्त गावकरी आणि भक्तगण यांना घेऊन मार्कंडा – रामाळा – घारगाव हरणघाट कवठी रुद्रापूर उसेगाव- जीबगाव- शिरसी-साखरी लोंढोली चीचडोह बॅरेज चामोर्शी क्रोसिंग मार्कंडादेवअसे अंदाजे 51 कि.मी. परिक्रमा करणार आहेत या उत्तर वाहिनी वैनगंगा नदीच्या एकूण 108 परीक्रमांमध्ये समस्त भक्तगण यांची सुध्दा उपस्थिती राहिल, म्हणजे ह्या परिक्रमा 108 दिवस म्हणजे 5 नोव्हेंबर 2025 पर्यंत सुरु राहतील.

या परिक्रमासाठी या परिसरातील ग्रामपंचायत आणि गावकरी यांचा सुद्धा पाठींबा असल्याचे प्रमाणपत्र दिले असून श्री मार्कडेश्वर देवस्थानचे बांधकाम किती संथ गतीने सुरु आहे हे समस्त भक्तगण यांच्या लक्षात आणून देणे आणि प्रशासनाचे लक्ष वेधून मंदिराचे बांधकाम पूर्ण करून घेणे.या परीक्रमेचे उद्देश ठेऊन जिर्णोद्वार समितीचे संत मुरलीधर महाराज यांच्या सह.. नरेंद्र जक्कुलवार, आशिष देवतळे,अशोक पोरेडीवार, विजय कोमेरवार, बबन वडेट्टीवार, उमेश पिटाले, दिलीप कोहपरे, अजय भोयर आदींच्या शिष्टमंडळाने चंद्रपूर जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे माहिती देण्यात आली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये