ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वर्धा पोलीसांनी केला एक तासात गुन्हा उघड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक 24/06/2025 रोजी फिर्यादी नामे नितीन नरेंद्र वाडेकर वय 35 वर्ष रा. वॉर्ड नंबर 1, बोरगाव मेघे, वर्धा यांनी पो स्टे वर्धा शहर येथे येउन तक्रार दिली कि, ते घर बांधकामाचे ठेकेदार असुन त्यांचे बांधकाम श्रीराम टाउन बोरगाव मेघे येथे सुरू आहे, बांधकामावरर असलेल्या झोपडीत त्यांनी दिनांक 21/06/2025 रोजी त्यांची लोहा कापण्याची कटर मशीन व कॉकीट तोडण्याची ब्रेकर मशीन असे ठेवले व दिनांक 24/06/2025 रोजी ते काम असल्याने पाहण्यास गेले असता त्यांना ते दिसुन आले नाही, त्यांचे अज्ञात इसमाने लोहा कापण्याची कटर मशीन व कॉकीट तोडण्याची ब्रेकर मशीन असा 13,000/- रू चा मुददेमाल चोरूण नेला आहे. अशा फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरूण पो स्टे वर्धा शहर येथे गुन्हे नोंद करण्यात आले.

पोलीस स्टेशन वर्धा शहर येथील गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख पोहवा शैलेश चाफलेकर यांना गुप्त बातमीदारा कडुन माहीती मिळाली कि, पो स्टे रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगार विशाल चंदु कु-हाडे वय 26 वर्ष रा. बेघर वस्ती पिपरी मेघे वर्धा व त्याचा साथीदार महादेव राजु मुळे वय 27 वर्ष रा. बेघर वस्ती पिपरी मेघे वर्धा यांनी सदर चोरी ही संगणमताने केली असुन चोरी केलेले लोहा कापण्याची कटर मशीन व कॉकीट तोडण्याची ब्रेकर मशीन हे त्यांचे घरी बेघर वस्ती पिपरी मेघे वर्धा येथे ठेवली आहे. अशा माहीती वरूण पोहवा शैलेश चाफलेकर व त्यांचे टिमने शिताफिने बेघर वस्ती पिपरी मेघे वर्धा येथे जाउन दोघांचाही शोध घेतला असता ते घरीच हाजर मिळुण आले, व त्यांचे घरी हाजर मिळुण आले. त्यांना लोहा कापण्याची कटर मशीन व कॉकीट तोडण्याची ब्रेकर मशीन बाबत विचारणा केली असता त्यांनी त्या काढुन देउन चोरीच्या असल्याचे सांगीतल्याने त्या दोन्ही आरोपींना ताब्यात घेउन त्यांचे ताब्यातुन 1) एक जुनी वापरती लोहा कापण्याची कटर मशीन किमत 3000/- रू 2) एक जुनी वापरती कॉकीट तोडण्याची ब्रेकर मशीन किमत 10,000/- रू असा एकुण किमत 133,000/- रू चा माल हस्तगत केला, वरूण त्यांना अटक करूण वर्धा पोलीसांनी एक तासात गुन्हा उघडकिस केला.

सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक अनुराग जैन, मा. अप्पर पोलीस अधिक्षक डॉ. सागर कवडे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा प्रमोद मकेश्वर, पोलीस निरीक्षक वर्धा पराग पोटे, पो. उपनि शरद गायकवाड, यांच्या मार्गदर्शनात गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस हवालदार शैलेश चाफलेकर, विजय पंचटिके, पवन लव्हाळे, नितीन इटकर, पोलीस शिपाई नंदकिशोर धुर्वे, शिवदास डोईफोडे, भुषण चव्हाण, सर्व पोलीस स्टेशन वर्धा शहर यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये