ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

माजी आमदार विजयराज शिंदे यांनी दिली श्री संत नरहरीनाथ महाराज संस्थानला भेट 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

बुलढाणा जिल्हा भाजपाचे नवनिर्वाचित अध्यक्ष माजी आमदार श्री.विजयराज शिंदे यांनी श्रीसंत नरहरिनाथमहाराज संस्थान येथे नुकतीच भेट देऊन दर्शन घेतले.

यावेळी संस्थानच्या वतीने पूज्यश्री महाराजांचे शुभहस्ते अध्यक्षपदी नियुक्ती बद्दल शिंदे यांचा सन्मान करून अभिनंदन केले

महर्षि वसिष्ठ वेद विद्यालय व श्रीसंत तुकाराममहाराज वारकरी विद्यालय व इतर उपक्रमांच्या नियोजित विकास प्रकल्पासंदर्भात माहिती दिली.

त्याच्या समवेत प्रतिष्ठानचे विश्वस्त श्री.पंडितराव पाथरकर, डॉ.गणेश मांटे, एकनाथ काकड, राजेशभुतडा, निलेश गीते, बळीराम.मापारी मामा व इतर पदाधिकारी व भाविक उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये