मानोलीमध्ये प्लास्टिकमुक्त कार्यक्रमाचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा.अशोक डोईफोडे
अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगड सिमेंट वर्क्सच्या सीएसआर अंतर्गत मानोली या गावात प्लास्टिकमुक्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
आपल्या जीवनासाठी प्लास्टिक अत्यंत हानिकारक आहे आणि ते संपूर्ण जीवजंतूंसाठी सुद्धा हानिकारक आहे. आपल्या पृथ्वीला सुरक्षित ठेवणे ही समाजातील प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे.
या कार्यक्रमाला गावातील ५९ ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमामध्ये माणिकगड कंपनीचे पर्यावरण विभागाचे शुक्ला सर यांनी गावकऱ्यांना अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले. यात प्रश्नोत्तरे सुद्धा होती, ज्यात बक्षीस वितरण करण्यात आले. श्री. पवन महाडुरकर सर* यांनी प्लास्टिकच्या पिशव्या न वापरता घरातीलच कपडे आणि पेपर वापरून विघटनशील पिशव्या कशा बनवायच्या, याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. महिला, छोटी मुले आणि युवकांनी प्लास्टिक बंदीवर अतिशय चांगल्या प्रकारे भाषणे दिली. यात सुद्धा प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले. प्रथम पारितोषिक अरुणा कस्ती यांनी, द्वितीय पारितोषिक नौशाद शेख यांनी, तर तृतीय पारितोषिक वैशाली महाडोळे यांनी पटकावले.
या कार्यक्रमामध्ये गावातील पोलीस पाटील चटप साहेब, सरपंच अनुसया उदे, उपसरपंच गणेश नैताम, ग्रामपंचायत सदस्य शंकर रामटेके आणि बोरकर ताई यांनी कार्यक्रमाला प्रोत्साहन दिले. यासह सर्व गावकऱ्यांनी सुद्धा या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला. सर्व गावकऱ्यांनी आणि गावातील सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी अल्ट्राटेक कंपनीचे धन्यवाद मानले.