ताज्या घडामोडी

मॅजिक बस संस्थेच्या वतीने सावली तालुक्यातील दहा गावांमध्ये पालक सभा व शैक्षणिक जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन

चांदा ब्लास्ट :

सावली प्रा.शेखर प्यारमवार

१३ ते २६ जून२०२३ दरम्यान सावली तालुक्यातील मौजा चीचबोडी, बेलगावं, निफंद्रा, पेंढरी(मक्ता), निमगाव, डोनाळा, लोंढोली,  व्याहाड बुज, व्याहाड खुर्द, जिबगाव येथे मॅजिक बस संस्थेच्या वतीने पालक सभा व शैक्षणिक जागृकता  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

पालक सभेच्या माध्यमातुन पालकांना शिक्षणाचे महत्त्व, स्त्री- पुरुष समानता , आरोग्य आणि उच्च शिक्षणाचे महत्व इत्यादी  विषयावर मॅजिक बस संस्थेचे शाळा सहाय्यक अधिकारी कु. श्रद्धा नागमोते व नीशा उमर्गुंडावार यांनी उपस्थित पालकांना मार्गदर्शन केले. मोठ्या उत्साहाने पालक, गावातील प्रतिष्ठित नागरिक, ग्रामपंचायत सदस्य व शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांनी कार्यक्रमात व स्पर्धेत सहभाग घेतला. स्पर्धेत विजयी झालेल्या व सहभागी सर्व महिलांना घरकामात उपयुक्त पडणाऱ्या वस्तू  मॅजिक बस संस्थेच्या वतीने प्रोत्साहन बक्षीस म्हणून देण्यात आल्या.

सदर कार्यक्रम व स्पर्धा मा. प्रशांत लोखंडे, वरिष्ठ जिल्हा कार्यक्रम अधिकारी मॅजिक बस चंद्रपूर व तालुका समन्वयक आकाश गेडाम यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आल्या.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळा सहाय्यक अधिकारी कु. श्रध्दा नागमोते, निशा उमरगुंडावार व समुदाय समन्वयक  सोनू कांबळे, शितल नस्कुलवार, सुरेन्द्र ठाकरे, साक्षी गंदाटे,हर्षा ठाकरे ,प्रणीता तोडेवार,निशा कोरेवार,आकाश भोयर,कविता बोधलकर,रुपाली कांबळे,अंकिता उरकुडे,शितल भोयर, यांनी अथक परिश्रम घेतले…

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये