ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बल्लारपूर पोलिसांनी एका इसमास पिस्टल (अग्निशस्त्र)सहित केले अटक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. मुन्ना खेडकर

बल्लारपूर :- पोलीस निरीक्षण असिफ राजा बी, शेख यांना गोपनीय माहिती मिळाली की एक इसम कमरेला पिस्टल (अग्निशस्त्र )घेऊन दहशत निर्माण करण्याचा उद्देशाने फिरत आहे. पोलीस निरीक्षक यांनी वेळ न गमावता त्या व्यक्ती चा शोध घेतला असता तो इसम fdcm मधील पडीत क्वाटर मध्ये असल्याची माहिती मिळताच मोट्या शिताफितीने सापळा रचून पोलीस टीम ने त्याला अटक करून त्याचा जवळील पिस्टल मोठा गुन्हा होण्याआधीच आरोपी कुणाल सुरेश वर्मा रा,(21)संतोषी माता वॉर्ड, बल्लारपूर, याला ताब्यात घेत पोलीस स्टेशन ला आणून गुन्हा दाखल क्र626/2024कलम 3,25,आर्म ऍक्ट अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

सदर कारवाई केल्यामुळे मोठी अनहोनी टाळली. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन,अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू,दीपक साखरे उपविभागीय पोलीस अधिकारी, राजुरा,यांचे मार्गदर्शन मध्ये पोलीस निरीक्षक असिफराजा बी शेख पो उप निरीक्षक प्रेम शहा सयाम, पो उप निरीक्षण विक्की लोखंडे,स, फो गजानन डोईफोडे,पो ह रणवीजय ठाकूर,पुरुषोत्तम चिकाटे,सुनील कामटकर, संतोष दंडेवार,सत्यवान कोटनाके,विशिष्ट रंगारी,शरदचंद्र कारुष, मिलिंद आत्राम,शेखर माथणकर,श्रीनिवास वाभिटकर इ, पोलीस कर्मचारी यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये