ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भारत संकल्प मोहीमे अंतर्गत लाभार्थींना उज्वला गॅस व गोल्डन कार्ड नागरिकांना वाटप

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

आज दिनांक रोजी सोनेगाव स्टेशन तालुका जिल्हा वर्धा येथे विकसित भारत संकल्प यात्रा मोहीमे अंतर्गत व आयुष्यमान भारत योजनेचा लाभ सोनगाव स्टेशन येथील निवासस्थानी नागरिकांना देण्यात आला.

यावेळी लाभार्थ्यांना जिल्हा पुरवठा अधिकारी शालीकराम भराडी व पुरवठा निरीक्षक अधिकारी महेश थेरे तहसील कार्यालय वर्धा यांच्या हस्ते उज्वला गॅस व आयुष्यमान भारत योजनेचे गोल्डन कार्ड वाटप करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाला उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले सोनेगाव स्टेशन येथील सरपंच उपसरपंच व ग्रामविकास अधिकारी व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये