ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मोटेगाव येथे 114 शाहिद आदिवासी गोवारी बांधवांना श्रद्धांजली व समाजप्रबोधन मेळावा संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. रोहन नन्नावरे

नेरी येथून जवळ असलेल्या मोटेगाव येथे दि 23 ला आदिवासी गोंड गोवारी जमात संघटने तर्फे 114 शहीद आदिवासी गोवारी बांधवांना श्रद्धांजली कार्यक्रम व समाज प्रबोधन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते मोट्या उत्साहात प्रबोधन मेळावा संपन्न झाला.

मोटेगाव येथे ग्रामस्वछता करून दोन दिवसीय कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली प्रथम संपुर्ण समाज बांधवांनी 114 शहीद आदिवासी गोवारी बांधवांना श्रद्धांजली अर्पण केली आणि समाज प्रबोधन मेळाव्याला सुरवात करण्यात यात संपूर्ण गावातून मिरवणूक काढून आदिवासी गोंडगोवारी संस्कृती चे दर्शन दाखविण्यात आले यामध्ये गुराखीसोबत गाय महिलांचे मुलींचे पुरुषांचे सामूहिक आदिवासी नुत्य दाखविण्यात आले तसेच पारंपरिक वाद्य डफरी यावर नुत्य सादर करण्यात आले.

यानंतर समाज प्रबोधन मेळाव्याला सुरवात करण्यात आली या कार्यक्रमाला तिरु.विलास कोराम व समाज प्रबोधन मेळाव्याचे अध्यक्ष- तिरु.सुभाष नेवारे सरपंच मोटेगाव ,प्रमुख मार्गदर्शक – प्रदीप येसनसुरे ग्रा.पं.सदस्य वाढोणा,व प्रमुख अतिथी -बापूरावजी येसनसुरे, सुभाष गजबे वाढोणा, आणि प्रमुख पाहुणे – प्रविण वाघाडे, किरणदास सोनवाने बोथल,मनोहर मसराम,आशिष नेटीनकर, प्रदीप सुकारे, एकनाथ नेवारे तसेच, चंद्रपूर जिल्हयातील कार्यकर्ते, व बहुसंख्य समाज बांधव प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी उच्च न्यायालयात गोवारी समाजाची शिफारस मान्य करून शिक्कामोर्तब केले तसेच गोवा राज्यातील आदिवासी संस्कृती गोंड गोवारी संबोधले आहे.

यावर मार्गदर्शन केले तसेच हा समाज अनुसूचित जमाती सर्व लाभ घेण्यास पात्र असल्याची माहिती दिली तसेच समाजातील शैक्षणिक आर्थिक व सामाजिक विषयावर मार्गदर्शन केले तसेच शासनाकडे पाठपुरावा सुरूच राहणार असल्याचे सांगितले यानंतर महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये