बोगस करार करूण सिमेंट कंपनीने मोबादला वाटला
दलालाने लाटला फसवणूकीचा गुन्हा दाखल करा
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
गडचांदुरस्थीत अल्ट्राटेकच्या माणिकगड युनिटने कुसुंबी येथील विवाद ग्रस्त २४ आदिवासी शेतकऱ्यांची जमीन १९८४ – ८५ मध्ये ६३ – ६२ हेक्टर जमीन भुपृष्ठ भोगाधिकारी मोबादला देऊन लिज करार केले होते या बाबत २०१५ मध्ये नागपूर खंडपिठात याचीका दाखल केली होती तसेच मानव अधिकार आयोग मुंबई व अनुजमाती आयोग दिल्ली येथे प्रकरण चालले महाराष्ट्र शासनाच्या विधान सभेत प्रश्न गाजला तत्कालीन मुख्यमंत्री पुथ्वीराज चव्हाण यांनी सभागुहात उत्तरादाखल कंपनीला नियमा नुसार भुपृष्ठ भाडे देऊन भाडेकरार ६३ -६२ हेक्टर जमीनीचा भोगाधिकार बहाल केला आहे . त्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या अहवालानुसार नव्याने मोबादला देता येणार नाही अशी घोषणा करूण प्रकरणावर पडदा टाकला ऐवढेच नव्हे तर जिल्हाधिकारी कंपनी व्यवस्थापन यांनी न्यायलयात शपथ पत्र दाखल करूण आनंदराव मेश्राम यांनी २०१५ मध्ये दाखल याचीका खारीज केली मानव अधिकार आयोग जमाती आयोग यांनी सुद्धा प्रकरण खारीज केले मात्र नागपूर खंडपिठात प्रकरण क्र४७३२ / १८ प्रलंबित असताना चुकीच्या पद्धतीने कंपनीचे कार्यात्मक प्रमुख मुकेश गहलोत नविन कौशीक महाव्यवस्थापक राजेश झाडे सचिन गोवारदिपे यांनी २४ आदिवासीचा खाण परिसरातील वास्तव्य घरे हरविण्याचे शासनाचे कोणतेही आदेश न्यायलयाचे आदेश नसताना दि ६ / ९ ।२४ व९ / ९ / २५ रोजी अश्या ६ बैठका घेऊन एम ओ एम करण्यासाठी बनावट दस्तावेज वारसाना डावलून काही मोजक्या मोरक्याना हाताशी पकडून हक्कापासून बाधीत व दावेदारी समझौता करार नायब तहसिलदार प्रदीप शिल यांना हाताशी धरून स्टॉम्प पेपरवर सहया घेऊन हेक्टरी १० लक्ष रुपये घराचे १ लक्ष व कूट्रबात २ नोकरीची आमीष देऊन खदान परिसरातून घरे बाहेर काढली व हा सर्व प्रकार आदिवासी च्या मुलभूत अधिकाराचा उल्लंधन करणार करार करूण या आदिवासी चे भारतीय स्टेट बॅक आवाळपुर व भारतीय स्टेट बॅकेच्या गडचांदूर शाखेत खाते खोलून सर्व कुटूंबाचे बॅक पासबुक आनंदराव मेश्राम व भारत आत्राम यांनी स्वताः कडे ठेऊन बॅकेत निळकंठ आत्राम यांना दि १७ / २ / २०२६ ला बॅकेत फोन करूण बोलविले व माझा आंगठा घेऊन ७ लाख ८० हजार काढून मला फक्त १० हजार दिल्याची व माझी फसवणूक केल्याची तक्रार पोलीस स्टेशन गडचांदूर ला दिली लिंगनडोह येथिल नामदेव जाधव यांचे कडून गडचांदूर बॅकेतुन पैसे काढून ४लाख ५० हजार रुपये घेतल्याची तक्रार बालाजी नामदेव जाधव यांनी केली मानीकगड सिमेंट कंपनीने भिमा मारू सिडाम हे २० वर्षापूर्वी मयत झाले यांच्या कुटुंबात ४ मुले वारस असताना ७ / १२ मध्ये वारसान नोंद न करता अय्यु भिमा सिडाम यांनी वारसाना डावलून बनावटी दस्तावेज तयार करूण संपूर्ण रक्कम स्वताः खात्यावर टाकण्यासाठी वारसाना माहीती न होऊ देता बॅक पासबुक स्वतः आनंदराव मेश्राम भारत आत्राम यांनी १९ लाख रक्कमेची मागणी व नियमबाहय कागदपत्रे तयार केल्याची तक्रार रामु भिमु सिडाम यांनी दाखल केली असून कंपनीने प्रथम शपथ पत्र देऊन सर्व प्रकरण खारीज केले असताना नव्याने मोबादला देण्याचे कायदेशिर कारण न समजने हे एक कोडेच असून संपूर्ण करारपत्राची व फसवणूक करुण लुबाडणाऱ्यावर कार्यवाही व्हावी अशी मागणी केल्या जात असून पोलीस काय कार्यवाही करतात याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे



