ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चांदा पब्लिक स्कूलमध्ये प्ले हाऊस उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर :_ विद्यार्थ्यांच्या, शैक्षणिक प्रवासातील पहिलं पाऊल आनंददायी, सुरक्षित आणि अविस्मरणीय व्हावे या उद्देशाने चांदा पब्लिक स्कूलच्या प्ले हाऊस विभागाचा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पाडण्यात आला. प्रांगणातील आकर्षक अशी सजावट व चिमुकल्यांच्या चेह-यावरील निरागस हास्यामुळे संपूर्ण परिसर आनंदाने उजळून निघाले.

कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या संचालिका श्रीमती स्मिता संजय जिवतोडे व मुख्याधापिका आम्रपाली पडोळे यांच्या हस्ते दिपप्रज्वलन व सरस्वती पुजन करुन करण्यात आली. त्यानंतर शाळेच्या मुख्याधापिका सौ. आम्रपाली पडोळे यांनी मुलांचा सर्वांगीण विकास हा खेळ, कृती आणि आनंदातुनच घडतो असे सांगत पालकांना प्ले हाऊस शिक्षणाचे महत्व समजावुन सांगितले.

त्यानंतर ‘लेट्स बिल्ड अ टॉवर’ या खेळाचे आयोजन करण्यात आले. पालकांनीही मुलांसोबत आनंदाने सहभाग नोंदवत आपल्या बालपणाच्या आठवणींना उजाळा दिला.

यावेळी शाळेच्या संचालिका श्रीमती स्मिता संजय जिवतोडे यांनी ‘प्रत्येक बालक हा वेगळा असतो’, त्याच्या कल्पनाशक्तीला, सर्जनशीलतेला योग्य दिशा देणे हेच प्ले हाऊसचे मुख्य उद्दिष्ट आहे आणि खेळीमेळीच्या वातावरणात दिलेले शिक्षण मुलांच्या भावनिक आणि शारिरीक विकासाचा पाया आहे हे समजावून सांगितले.

पुर्व प्राथमिक विभाग प्रमुख शिल्पा खांडरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्ले हाऊस चिमुकल्यांचे हर्षाेउल्हासात स्वागत करण्यात आले असुन कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिक्षिका मनीषा नागोशे आणि अल्फा बोरम यांनी तर आभार प्रदर्शन शिक्षिका योगीता आसवानी यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये