ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अनैतीक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्ष तथा स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा पथका कडुन देहव्यापार करणाऱ्या आरोपीवर रेड

एका पिडीतेची सुटका करुन महीला आरोपीतांचे ताब्यातुन एकुण ३७ हजारावर मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक २४/०९/२०२६ रोजी अनैतीक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्ष, वर्धा चे पथक कार्यालयात हजर असतांना गोपनीय माहीती प्राप्त झाली की, “एक महीला जिचे पुर्ण नाव माहीत नाही, रा. वर्धा ही महीला स्वतःचे आर्थीक फायदया करीता मुलींना पैशाचे आमीष देवून देहव्यापारास प्रवृत्त करून त्यांना सालोड (हिरापुर), वर्धा पो.स्टे. सावंगी (मेघे) जि. वर्धा येथे फलॅटवर बोलावुन ग्राहक यांना पुरवुन देहव्यापार करून घेते.” अशी माहीती प्राप्त झाल्याने सदरची माहीती स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा चे प्रमुख श्री. विनोद चौधरी यांनी सदर माहीती मा. पोलीस अधिक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल, यांना देवुन त्यांनी दिलेल्या सुचना व निर्देशाप्रमाणे अत्यंत गोपनीयता बाळगुण बनावटी ग्राहक (पंटर) तयार करुन रेड कार्यवाही दरम्याण दिलेल्या सुचना प्रमाणे त्याने दिलेल्या ईशाऱ्या वरुन अनैतीक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्ष तथा स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा चे पथका मार्फत तक्षक सिटी, परीसरातील बि विंग इंमारतीचे पहील्या माळयावरील फ्लॅट कमांक 103. सालोड (हिरापुर), वर्धा येथील महीला आरोपीचे ताब्यातील फ्लॅटवर रेड केला असता सदर फ्लॅट मध्ये महीला आरोपी नामे सौ. प्रतिभा समीर कवडे, वय 40 वर्ष, रा. धांदे यांचे घरी, गॅसगोडावुन जवळ, सिंदी (मेघे), वर्धा हे मिळुन आली सदर फ्लॅटची झडतीत एका रुम मध्ये बनावटी ग्राहक व एक पिडीत महीला देहव्यापार करीत असतांना मिळुन आली. सदर पिडीत महीला हीला विचारपुस केली असता ती वर्धा येथील असल्याचे सांगुन तिला महीला आरोपी नामे सौ. प्रतिभा समीर कवडे, वय 40 वर्ष, रा. धांदे यांचे घरी, गॅसगोडावुन जवळ, सिंदी (मेघे), वर्धा हीने देहव्यापारा करीता पैशाची आमीश देवुन बोलाविले असल्याचे सांगीतले. महीला आरोपीतांचे ताव्यातुन दोन अॅन्ड्राईड मोवाईल, नगदी २,९००/-रु, देहव्यापारा करीता लागणारे साहीत्य असा एकुण जु. किंमत ३७,९००/- रु चा मुद्देमाल मिळुन आल्याने महीला आरोपी विरुध्द पोलीस स्टेशन सावंगी (मेघे), जिल्हा वर्धा येथे कलम १४३ (२) भारतीय न्याय सहीता २०२३ सह कलम ३, ४, ५, ७ अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनीयम १९५६ प्रमाणे गुन्हा नोंद करुन पिडीत महीला हीला महीला सखी वन स्टॉप सेंटर, महीला व बाल विकास विभाग, वर्धा येथे दाखल करण्यात आले आहे.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. सदाशिव वाघमारे, यांचे मार्गदर्शनात स्थानीक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, सहा. पोलीस निरीक्षक आशिषसिंह ठाकुर, पोलीस अंमलदार दिवाकर परिमळ, अमर लाखे, संजयसिंग सुर्यवंशी, चंद्रकांत बुरंगे, संजय राठोड, नितेश मेश्राम, शबाना शेख, नवनाथ मुंडे, मंगेश चावरे, गजानन दरणे, सर्व नेमणूक अनैतीक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्ष तथा स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये