ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ओबीसी जिल्हा उपाध्यक्षपदी पुल्लावार, पोंभुर्णा तालुका अध्यक्षपदी पाल

आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्राचे वितरण

चांदा ब्लास्ट

ओबीसी काँग्रेस कमिटीकडून ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष पदी अशोक पुल्लावार, पोंभुर्णा तालुका अध्यक्ष पदी अमित पाल व पोंभुर्णा तालुका युवक अध्यक्ष पदावर हेमंत आरेकर यांची नियुक्ती करण्यात आली.

आज चंद्रपूर येथील धानोरकर जनसंपर्क कार्यालय येथे आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

याप्रसंगी ओबीसी जिल्हाध्यक्ष प्रशांत दानव, काँग्रेस नेते विनोद अहिरकर, पोंभूर्णा काँग्रेस तालुका अध्यक्ष तथा पोंभूर्णा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती रवी मरपल्लीवार, सुधाकर जीवनकर, वैशाली पुल्लावार यांची उपस्थिती होती.

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी ओबीसी समाज बांधवांच्या न्याय हक्कासाठी काम करण्याचे आवाहन यावेळी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये