मोटार सायकल व मोबाईल फोन चोरी करणारा चोर बडवानी (मध्ये प्रदेश) येथुन गजाआड
शहर गुन्हे शोध पथकाची कार्यवाही

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
गुन्ह्याची हकीकत याप्रमाने आहे की, यातील फिर्यादी नामे विशाल अशोकरराव धुरतकर वय 22 वर्षे व्यवसाय हॉटेल व्यवस्थापक रु. टेभांरी परसोडी ता. आर्वी जी. वर्धा 30/05/2023 रोजी 02/00 वाजता. ते 05/00 p.m. हॉटेल पार्थ येथे ते काम करत असताना.,
अज्ञात व्यक्तीने त्यांची टीव्हीएस मोटारसायकल क्र. एमएच 32 एयू 9027 किमतीचा 70000/- रुपये व ओप्पो कंपनीचा 4000/- रुपये किमतीचा मोबाईल अज्ञात चोरट्याने चोरून नेला. स्टॅ. वर्धा शहर ला अप क्र. 638/2023 फौजदारी संहितेच्या कलम 379 अंतर्गत वर्धा शहर गुन्हे शोध पथकाने तपासाचे सुत्र हातात घेवुन तांत्रिक दृष्या तपास करून सदर गुन्ह्यातील आरोपी तसेच मोटार सायकल व मोबाईल फोन हा बडवानी जिल्हा बडवानी (मध्य प्रदेश) येथे असल्याचे निष्पन्न करून वरिष्टांचे आदेशाने बडवानी (मध्य प्रदेश) येथे पोलीस पथक रवाना होवुन तेथुन आरोपी नामे संजय राधेश्याम मुकाती वय 25 वर्ष रा. कल्यानपुरा बडवानी (मध्य प्रदेश) याचे ताब्यातुन सदर गुन्ह्यातील एक काळ्या रंगाची tvs कंम्पनीची raider मोटार सायकल कींमत 70000/- रू व एक OPPO कंम्पनीचा अँडरॉइड मोबाईल फोन अंदाजी कींमत 4000/- रू असा एकुन जु. की. 74000/- रू चा माल जप्त करून आरोपीसह पोलील स्टेशन वर्धा शहर ला येवुन आरोपीस अटक केले.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक साहेब नुरुल हसन, अप्पर पोलीस अधिक्षक डॉ. सागर कवडे साहेब, उप विभागीय पोलीस अधिकारी साहेब प्रमोद मकेश्वर यांचे मार्गदर्शनात व पो.नी. धनाजी जळक पो. स्टे वर्धा शहर यांचे निर्देशान्वये गुन्हे शोध पथकाचे सफौ नितीन रायलकर, पोहवा किशोर पाटील, पोलीस अमलदार राधाकीसन घुगे, दिनेश आंबटकर, राजेंद्र ढगे पो. स्टे वर्धा शहर व सायबर सेल चे पोलीस अमलदार अंकित जीभे यांनी केली