ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अवैध रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टर वर भद्रावती महसूल विभागाची कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

भद्रावती तालुक्यातील मांगली येथील एका नाल्यातून रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टर वर कारवाई करीत सदर ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहे. सदर कारवाई भद्रावती महसूल विभागाद्वारे दिनांक 15 ला करण्यात आली. महसूल विभागाच्या पथकाची गस्त चालू असताना मांगली येथील नाल्यात एम एच 34 cd 01120 या ट्रॅक्टरच्या सहाय्याने अवैध रेती तस्करी करताना आढळून आले.त्यानुसार सदर कारवाई करण्यात आली.

सदर ट्रॅक्टर हे मांगली येथील घनश्याम उताणे यांच्या मालकीचे आहे.सदर कारवाई तहसीलदार राजेश भांडारकर यांच्या मार्गदर्शनात पथक प्रमुख संतोष खाडरे, दडमल, म्हस्के व संदीप मुरकुटे यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये