घोडपेठ कर्मवीर विद्यालयाचा उत्कृष्ट निकाल
४ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत : शाळेचा निकाल ७८.३१ टक्के

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
नागपूर विभागीय मंडळाचा एस एस सी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला यात भद्रावती तालुक्यातील कर्मवीर विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय घोडपेठ या विद्यालयाचा निकालात या शाळेतील विद्यार्थ्यानी घवघवीत यश संपादन केले असून शाळेतून एकूण ८३ विदयार्थी प्रविष्ट झाले होते.त्यातून ६५विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
निकालाची टक्केवारी ७८.३१असून प्राविण्य श्रेणीत ४ विदयार्थी आले तर प्रथम श्रेणीत २०असून द्वितीय श्रेणीत ३३ पास श्रेणीत ८ विदयार्थी आलेत त्यात सर्वप्रथम कु सोनाली विजय साखरकर या विद्यार्थिनीने ८५.४०% गुण प्राप्त केले तर कु अश्विनी सुधाकर खिरटकर हिला ८४.००%, कु प्राची गणपत उंडीरवाडे ७९.६०%तसेच कू जानवी कमलाकर खिरटकर हिने ७६.८०% गुण प्राप्त केले.
सर्वांनी आपल्या यशाचे श्रेय शाळेचे मुख्याध्यापक श्री.नरेश साळवे सर तसेच शाळेतील सर्व शिक्षक कर्मचारी वृंद यांना दिले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे परिसरातील सर्वत्र कौतुक केले जात आहे.