बुद्ध जयंती निमित्त गडचांदूर येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी प्रा. अशोक डोईफोडे
गडचांदूर -महाकारुणीक तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त संयुक्त जयंती समारोह समिती,गडचांदूर द्वारा दि 12 मे 2025 ला भव्य खुल्या रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.बुद्धपोर्णिमा -गौतम बुद्ध जीवन चरित्र तथा बौद्ध धम्मावर आधारित स्पर्धा विषय ठेवण्यात आला होता. गडचांदूर येथील सर्व बौद्ध विहार व पंचशील झेंड्याजवळ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. जवळपास 50 स्पर्धकांनी सहभाग घेतलेल्या या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक संगीता नगराळे यांनी पटकावला दोन हजार रुपये सन्मान चिन्ह व सन्मानपत्र असे बक्षिसाचे स्वरूप होते द्वितीय क्रमांक रूपाली वानखेडे यांनी पटकावला दीड हजार रुपये सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे बक्षिसाचे स्वरूप होते तर तृतीय क्रमांक साक्षी काटरे यांनी मिळविला हजार रुपये सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे बक्षिसाचे स्वरूप होते.प्रोत्साहनपर बक्षीसअनुष्का सिरटकर,सुहाना पाटील यांनी पटकावले या स्पर्धेचे परीक्षण रवी ताकसांडे,प्रा सोज्वल ताकसांडे, शोभना खैरे यांनी केले.
दिनांक 14 मे 2025 ला धम्म संगीत रजनी या कार्यक्रमांतर्गत बुद्ध भीम गीते तसेच समाज प्रबोधनपर कव्वालीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी भीम क्रांतीचा बुलंद आवाज महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक,प्रबोधनकार विकास राजा यांनी बहारदार कार्यक्रमाचे सादरीकरण करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. धम्म संगीत रजनी कार्यक्रमाचे उदघाटन तथा रांगोळी स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष आशिष चव्हाण साहेब (मुख्याधिकारी नगरपरिषद गडचांदूर) हे होते तर कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून प्रा कीर्तीकुमार करमणकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समितीचे अध्यक्ष डॉ.हेमचंद दूधगवळी यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समितीचे कोषाध्यक्ष प्रा.प्रशांत खैरे यांनी केले तर आभार समितीचे उपाध्यक्ष प्रेम वानखेडे यांनी मानले.
कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी सचिन कांबळे,देविदास मुन,विक्की मुन,अशोककुमार भगत,,पंडित डोंगरे,सुभाष सीरटकर,अमित थोरात,महेश ससाने,अजय साखरे,दयाशंकर खैरे,अंकुर गावंडे,प्रकाश मुन,प्रकाश चुनारकर,देवानंद मुन,जयदीप पाटील,प्रणय रामटेके,राजू चारभे यांनी मोलाचे परिश्रम घेतले.