ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
रिक्षाचालकांची मुलगी बनली राजपत्रित अधिकारी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
केडगाव अहील्यानगर येथील रिक्षा चालक संजय रासकर यांची मुलगी कू मयुरी या सावित्रीच्या लेकी ने महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत घेतलेल्या परीक्षेत राज्यात 33 वा क्रमांक व ओ बी सी मध्ये 7 वां क्रमांक पटकावला आहे, राजपत्रित वर्ग 1 अधिकारी म्हणून निवड झाली आहे. मयुरी हिने यापूर्वी जलसंधारण विभाग परभणी येथे 6 महिने व छत्रपती संभाजी नगर येथे 4 महिने काम केले. त्यानंतर लोकसेवा आयोगाची परीक्षा पास करून क्लास वन अधिकारी पदी निवड झाली आहे. मयुरी व तिच्या कुटुंबाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
महाराष्ट्र राज्य माळी समाज कर्मचारी महासंघ, देऊळगाव राजा ने मयुरी चे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.