संकल्प मेश्रामला गणितात 100% तर विज्ञान विषयात 99% गुण
सोनिया गांधी कॉन्व्हेन्ट चा 97.37% निकाल

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी
आशिष रैच राजुरा
आज जाहिर झालेल्या शालांत परीक्षेच्या निकालात सोनिया गांधी इंग्लिश पब्लिक स्कुल राजुरा ने उत्कृष्ठ निकालाची परंपरा कायम राखताना 93.37% निकाल दिला असुन शाळेच्या संकल्प मेश्राम ह्याने गणितात 100% आणि विज्ञान मध्ये 99% गुण प्राप्त करून आपली प्रतिभा साकारली सिद्ध केली आहे. सोनिया गांधी इंग्लिश पब्लिक स्कूल मधून यंदा 38 विद्यार्थी परीक्षेत बसले त्यापैकी 37 विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर एका विद्यार्थ्याला केवळ एक गुण कमी पडल्याने अनुत्तीर्ण व्हावे लागले.
गणित व विज्ञान विषयांत दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या संकल्प मेश्राम ला 93% गुण प्राप्त झाले. सान्वी शेरकी 86.40%, बलराज पोटे आणि श्रवणी रामगीरवार यांना 84.60% गुण प्राप्त झाले. दहावीचा शाळेचा निकाल 97.37 टक्के लागला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष अविनाश जाधव, उपाध्यक्ष दत्तात्रय येगीनवार, कोषध्यक्ष तथा माजी आमदार सुदर्शन निमकर, सचिव ॲड अरुण धोटे, संचालक तथा प्राचार्य डॉ. एस एम वारकड, सहसचिव बी यु बोर्डेवार, प्राचार्या कृतिका सोनटक्के, मुख्याध्यापिका शबनम अन्सारी, उपप्राचार्या रफत शेख यांनी अभिनंदन केले आहे.