डॉ. धनराज खानोरकरांच्या ‘संजोरी’ला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा राज्यस्तरीय वाड्मय पुरस्कार
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
ब्रह्मपुरी :_ जिल्हातील ब्रह्मपुरी येथील प्रसिद्ध कवी, लेखक,वक्ते, पत्रकार तथा ३३ व्या झाडी बोली साहित्य संमेलनाचे अध्यक्ष,नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयातील मराठी विभागप्रमुख डॉ.धनराज लक्ष्मण खानोरकर यांच्या बहुचर्चित ‘संजोरी’ ग्रंथाला २०२५ चा अतिशय प्रतिष्ठेचा समजला जाणारा महाराष्ट्र साहित्य परिषद,पुणे शाखा सोलापूरचा राज्यस्तरीय स्व.डाॅ. मधुकर कृष्णाजी झांबरे स्मृती साहित्य पुरस्कार घोषित झालेला आहे.पुरस्काराचे स्वरुप आकर्षक सन्मानचिन्ह,रोख रक्कम,सन्मानपत्र, शाल असे राहणार असून ०४ऑक्टो.२०२६ ला सोलापूरला मान्यवरांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येईल.’संजोरी’ ग्रंथ हा गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीच्या बी.ए. द्वितीयच्या अभ्याक्रमात असून झाडी बोलीतील लोककला,लोकजीवन आणि लोकसंस्कृतीवरचे त्यांनी यात उत्कृष्ट ललित लेखन केले आहे.संत गाडगेबाबा,अमरावती विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातही ग्रंथातील पाठ समाविष्ट आहेत,हे विशेष.
डॉ.खानोरकरांचे पाच काव्यसंग्रह प्रकाशित असून तीन संपादित व एक ललितग्रंथ प्रकाशित आहे.’ माझी पत्रकारिता ‘ ग्रंथ प्रकाशनाच्या वाटेवर असून अनेक वृत्तपत्रांतून त्यांनी स्तंभलेखनही केलेले आहे. सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल अनेक पत्रकार,प्राध्यापक, कवी,लेखक व मित्रमंडळींनी डॉ खानोरकरांचे भरभरुन अभिनंदन केले असून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.



