ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गोंडपिपरीत शिक्षकांचा गौरव सोहळा ; सेवानिवृत्तांसह गुणवंत व नवनियुक्त शिक्षकांचा होणार सन्मान

अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचा पुढाकार ; जिल्हा शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षकांसह बदली झालेल्या सभासदांचाही गौरव

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

गोंडपिपरी :_ अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ, तालुका शाखा गोंडपिपरीच्या वतीने शिक्षकांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी सत्कार व गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात सेवानिवृत्त शिक्षक, नव नियुक्त शिक्षक, जिल्हा शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक तसेच जिल्हांतर्गत बदलीने बदलून गेलेले व नव्याने आलेले संघटनेचे सभासद यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

शिक्षकांच्या शैक्षणिक व सामाजिक योगदानाची दखल घेत त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शिक्षण क्षेत्रात दीर्घकाळ सेवा बजावून निवृत्त झालेल्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याबरोबरच नव्याने सेवेत दाखल झालेल्या शिक्षकांचे स्वागत आणि त्यांना प्रोत्साहन देण्याचा उपक्रमही या माध्यमातून राबविण्यात येणार आहे.

याशिवाय जिल्हा शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा विशेष सत्कार करण्यात येणार असून, त्यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन त्यांचा गौरव केला जाणार आहे. तसेच पवित्र पोर्टलद्वारे नियुक्त झालेल्या नव नियुक्त शिक्षकांचाही गुणगौरव करण्यात येणार आहे.

जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेमुळे गोंडपिपरी तालुक्यातून इतरत्र गेलेले तसेच तालुक्यात नव्याने दाखल झालेले संघटनेचे सभासद यांचाही या कार्यक्रमात सन्मान करण्यात येणार आहे. त्यामुळे शिक्षकांमधील परस्पर स्नेह, संवाद आणि संघटनात्मक बांधिलकी अधिक दृढ करण्यासाठी हा सोहळा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

रविवार, दि. २७ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. धनोजे कुणबी मंगल कार्यालय, गोंडपिपरी येथे हा सोहळा पार पडणार आहे. शिक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या गौरव सोहळ्याला सहभागी व्हावे, असे आवाहन अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ, तालुका शाखा गोंडपिपरीच्या वतीने करण्यात आले आहे

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये