ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महात्मा गांधी विद्यालय येथे पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 महात्मा गांधी विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालयात पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती 25 सप्टेंबर रोजी साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य श्री प्रफुल्ल माहुरे होते तर प्रमुख पाहुणे स्वाती केळकर उपस्थित होत्या. सर्वप्रथम दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

प्रा.चेतना येरणे यांनी पंडीत दीनदयाल उपाध्याय यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला कार्यक्रमाचे संचालन प्रा विवेक पाल यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा बाळू उमरे यांनी केले. या कार्यक्रमाला प्रा माधुरी पेटकर,श्वेतलाना टिपले, प्रा. मंजुषा टेकाम,प्रा. सचिन भैसारे उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये