ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पेन्शनर्स असोसिएशनची वार्षिक आमसभा २७ सप्टेंबरला

७५ वर्षे पूर्ण केलेल्या सभासदांचा होणार सत्कार : वार्षिक जमा-खर्चासह विविध विषयांवर चर्चा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

 भद्रावती तालुका पेन्शनर्स असोसिएशनची सन २०२५-२६ या वर्षाची वार्षिक आमसभा रविवार, २७ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता ज्येष्ठ नागरिक भवन, पंचायत समितीजवळ, भद्रावती येथे आयोजित करण्यात आली आहे. संस्थेचे अध्यक्ष चं. पु. आसवले यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा होणार असून तालुक्यातील सर्व निवृत्त वेतनधारक बंधू-भगिनींनी उपस्थित राहावे, असे आवाहन असोसिएशनतर्फे करण्यात आले आहे.

सभेच्या प्रारंभी दीपप्रज्वलन करून वर्षभरात निधन झालेल्या ज्ञात-अज्ञात सभासदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे. त्यानंतर मागील सभेचे इतिवृत्त वाचन करून मंजुरी देणे, वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या सभासदांचा सत्कार करणे, सन २०२५-२६ या वर्षाचा वार्षिक अहवाल व जमा-खर्चाचे वाचन करून त्यास मंजुरी देणे, तसेच सन २०२६-२७ च्या अंदाजपत्रकास मंजुरी देणे आदी विषयांवर चर्चा होणार आहे.

उपलब्ध आर्थिक अहवालानुसार सन २०२५-२६ मध्ये आजीवन सभासद शुल्क, इतर जमा रकमा आदी मिळून एकूण जमा रक्कम ४६ हजार २९५ रुपये नमूद करण्यात आली आहे. विविध प्रशासकीय, प्रवास, स्टेशनरी, कार्यसभा व अन्य खर्चानंतर संस्थेकडे रोख व बँक शिल्लक असल्याचे अहवालात नमूद आहे.

अध्यक्षांच्या परवानगीने वेळेवर प्राप्त होणाऱ्या विषयांवरही चर्चा करण्यात येणार आहे. सभेसंबंधी प्रश्न असल्यास ते २० सप्टेंबरपर्यंत अध्यक्ष किंवा सचिवांकडे लेखी स्वरूपात देण्याचे आवाहन करण्यात आले होते. गणपूर्तीअभावी सभा तहकूब झाल्यास त्याच दिवशी त्याच ठिकाणी अर्ध्या तासानंतर सभा घेण्यात येणार आहे.

असोसिएशनचे अध्यक्ष चं. पु. आसवले, कार्याध्यक्ष वि. वा. पांढरे, उपाध्यक्ष वि. कृ. गारसे, सचिव प्रभाकर डोंगरे, सहसचिव अशोक वैद्य आणि कोषाध्यक्ष भा. का. दैवलकर यांनी सभासदांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये