वर्धा रेल्वे स्टेशन परिसरातून महिलेचे अपहरण आणि सामूहिक बलात्कार प्रकरणी पाच जणांना अटक
चार आरोपी व एक विधी संघर्षग्रस्त मुलाला पकडून न्यायालयाने तीन दिवसांची दिली पोलीस कस्टडी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
श्री मंगेश शिंदे पोलीस अधीक्षक लोहमार्ग नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली कारवाई
दिनांक 25/09/2026 रोजी पिडीत मुलगी वय 20 वर्ष हि रेल्वे स्टेशन वर्धा येथील मेन गेट बुकिंग कार्यालय जवळ बसून असताना रात्रीच्या 02 वाजताच्या सुमारास ऑटोरिक्षा चालक यांनी तिला बळजबरीने उचलून ऑटोरिक्षा मध्ये बसवून वर्धा शहरात घेऊन गेले व अंधा-या जागेत नेवून वरील आरोपींने सामुहिक आळीपाळीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि तेथून आरोपी पसार झाले यानंतर पिडीत फिर्यादी मुलगी वय 20 वर्ष इने वर्धा शासकिय रेल्वे पोलीस स्टेशन येथे येऊन वरून पाच आरोपी विरुद्ध तक्रार दाखल केली.

यानंतर वर्धा रेल्वे पोलीस स्टेशनचे ठाणेदार विरसेन चंहादे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करुण अपराध क्रमांक 275/2026कलम 70(1) बी एन एस दाखल करण्यात आला आणि रेल्वे पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व कर्मचारी गुन्हा उघडकीस आण्याकरीता रेल्वे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी तपास सुरू केला आणि संशयित आरोपी उचलून आणले असताना रेल्वे पोलीसांनी आपला हात दाखविले असताना तेव्हा आरोपींने आपले तोंड उघडले आणि सांगितले की आम्ही पिडीत मुलगी बळजबरीने सामुहिक आळीपाळीने बलात्कार केला यानंतर आरोपीचे नाव सांगितले आरोपी नंबर (1) विक्रम उर्फ, गोलू दिनेशराव खंडाळे वय 28 वर्ष व्यवसाय ऑटोचालक पत्ता आर्वीनाका इंदिरा नगर, झोपडपट्टी वार्ड नंबर 1वर्धा आरोपी नंबर (2)ओम उर्फ दुर्लभ सुनील बावणे वय 18 वर्ष व्यवसाय बॅनर फिंटींग पत्ता मांगतपुरा गोंडप्लाॅट दिनेश जैस्वाल यांच्या घराजवळ शिवाजी चौक वर्धा आरोपी नंबर (3) शेख मोहसिन उर्फ मुसा, शेख कासम कनोजे वय 29 वर्ष व्यवसाय ऑटो चालक पत्ता आर्वीनाका गजानन नगर वार्ड नंबर 01 वर्धा आरोपी नंबर (4) शेख साहिल शेख शरीफ वय, 32 वर्ष व्यवसाय ऑटो चालक पत्ता महादेवपूरा ताज वेल्डिंग वार्ड नंबर 14 वर्धा आरोपी नंबर पाच विधी संघर्षित बालक, वय 17 वर्ष राहणार वर्धा यांना न्यायालयात हजर केले असताना तीन दिवसांची पोलीस कस्टडी देण्यात आली यानंतर पोलीसांनी आपला हात दाखविले असताना आरोपींनी कबुली दिली की आम्ही पिडीत महिला ईचा सोबत आळीपाळीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले अशी माहिती शासकीय रेल्वे पोलीस स्टेशन वर्धा येथे देण्यात आली आहे.
सदरची हि कारवाई मंगेश शिंदे पोलीस अधीक्षक लोहमार्ग नागपूर डॉ दत्ताराम राठोड अप्पर पोलीस, अधीक्षक लोहमार्ग नागपूर शंकर शेळके उपविभागीय पोलीस अधिकारी लोहमार्ग अकोला पंजाबराव डोळे स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांच्या मार्गदर्शनाखाली विरसेन चंहादे पोलीस निरीक्षक प्रभारी पोलीस अधिकारी शासकीय रेल्वे पोलीस स्टेशन वर्धा नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक पंकज ढोके प्रभारी पोलीस अधिकारी रेल्वे स्टेशन बडनेरा पोलीस उपनिरीक्षक अंगद कोतवाड रेल्वे पोलीस स्टेशन वर्धा पोलीस उपनिरीक्षक निरीक्षक नितीनकुमार जाधव पोलीस हवालदार संतोष वडगोरे पोलीस हवालदार डेहनकर पोलीस हवालदार अशोक हनवंते, गोंधळे, घरडे, सहारे, प्रज्वल दाभाडे, गौतम शिरसाठ, अजय मनस्कार, निलेश काळे, असलम केंद्रे यांनी केलेली आहे.



