जिवतीत गांजा तस्करी करणाऱ्या एकास अटक
जिवती पोलिसांची दमदार कामगिरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- तालुक्यातील कुंभेझरी येथील गांजाची तस्करी करणाऱ्या एका आरोपीला स्थानिक पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून सुमारे १२४५ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आलेला आहे. अनिल पांडुरंग बसवंते (वय – ३६) रा.कुंभेझरी असे आरोपीचे नाव आहे.
मौजा कुंभेझरी येथे राहणारा आरोपी अनिल पांडुरंग बसवंते हा आपले घरी अवैध रित्या गांजा बाळगून चिल्लर विक्री करीत आहे अशी गोपनीय माहिती जिवती पोलिसांना मिळाली. सदर माहितीच्या आधारे आरोपीचे घराचे झडती करीता पोलीस अधीक्षक चंद्रपूर मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू, उपविभागीय पोलिस अधिकारी गडचांदुर रवींद्र जाधव यांचे निदर्शनात पोलीस निरीक्षक कांचन पांडे, पोलीस अंमलदार जगदीश मुंडे, ज्ञानेश्वर डोकळे, किरण वाठोरे, अतून कानवटे यांनी व दोन अब्रूदार पंचासमक्ष सदर आरोपीचे घराची घर झडती घेतली असता त्याचे घरातील किचन रूम मध्ये किचन ओट्याखाली एका कापडी पिशवीमध्ये एकूण १२४५ ग्रॅम वजन असलेला गांजा किंमत १२००० रू. मिळून आल्याने सदर आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन जिवती येथे अप क्र. ४३/२०२५ कलम २० (ब) गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिक १९८५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर गुन्ह्यात आरोपी नामे अनिल पांडुरंग बसवंते (वय – ३६) रा. कुंभेझरी अटक करण्यात आली. असून सदर गुन्ह्याचा तपास पोलीस स्टेशन जिवती येथील पोलीस निरीक्षक कांचन पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निलेश वाडीवा हे करीत आहेत.