ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
ग्रामपंचायत गोळेगावची 100 टक्के कर वसुली
सुंदर शाळा व टी बी मुक्त मध्ये प्रथम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
ग्रामपंचायत गोळेगाव ने गृह कर व पाणी कर ची वसुली 100 टक्के करून तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. घर कर रूपये 2,23,224, व पाणी कर रुपये 2,10,175 असा एकून 4,33,399 कर वसूल करण्यात आला आहे.
सुंदर माझी शाळा व टी बी मुक्त अभियान मध्ये सुद्धा तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
पंचायत समितीच्या वार्षिक आमसभेत आमदार मनोज कायंदे यांच्या हस्ते ग्राम पंचायतच्या पदाधिकाऱ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.