ईद-ए-मिलन समारोह कोरपना येथे संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
कोरपणा नगरीत प्रथमच रमजान ईदच्या पर्वावर 5 एप्रिल कोरपना येथील भाजपचे पदाधिकारी श्री. अबरार अली यांचे माध्यमातून आयोजित केलेल्या ईद-ए-मिलन समारोहास अगत्याने उपस्थित राहून याठिकाणी जमलेल्या मुस्लिम बांधवांशी स्नेहपुर्वक संवाद साधला.
प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांनी आपल्या आचरणातून विश्वबंधुत्व व शांततेचा संदेश दिला. या संदेशाचे स्मरण करावयाच्या या महान पर्वाच्या सर्वांना शुभेच्छा देतो असे प्रतिपादन याप्रसंगी बोलताना केले.
यावेळी माझ्यासमवेत तालुकाध्यक्ष संजय मुसळे, शहराध्यक्ष अमोल आसेकर, विशाल गज्जलवार, आबिद अली, अरूण मडावी, कोरपन्याचे पोलीस निरीक्षक राजपुत, मुख्याधिकारी येमाजी धुमाळ, सुहेल अली, विजय रणदिवे, दिनेश ढेंगळे, पवन मोहितकर, पवन बुरेवार, सुनिल बावणे, पद्माकर धगडी, उमेश पालीवाल, नदिमभाई, अजीम बेग, तुषार देवकर, मौलाना सद्दाम, विक्की उरकुडे, सय्यद असरार अली, मसरूद्दीन काझी,अल्का रणदिवे, ज्योत्स्ना वैरागडे, वर्षा लांडगे, इंदिरा कोल्हे, सत्यवान घोटेकर, शांताराम देरकर, शंकर चिंतलवार, अभय डोहे, संतोष घोरूडे, सलीमभाई, सुभाष हरबडे, अल्ताफभाई, शहबाजभाई, मोहब्बतभाई आदिंसह नागरीकांची प्रामुख्याने उपस्थिती होती.