ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनामध्ये ऑक्सिजन वायू म्हणून प्रत्येक ठिकाणी पोहोचणारे शांतीलाल मुथा _ अजितदादा पवार

उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले सन्मानित बीजेएस चे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथा नवरत्न पुरस्काराने सन्मानित

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

राज्यातच नव्हे तर संपूर्ण भारतात ज्या ज्या ठिकाणी नैसर्गिक आपत्तीने नुकसान झालेले आहे त्या त्या ठिकाणी समाजाचे काहीतरी देणे लागते या भावनेने भारतीय संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथा हे ऑक्सिजन वायू म्हणून सर्वांच्या कामी पडतात.

असे उद्गगार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी लोकाशा परिवार कडून आयोजित नवरत्न पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी शांतीभाऊंचा सन्मान करताना काढले यावेळी राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे, विजयजी बंब व बरेच मान्यवर उपस्थित होते याबाबत सविस्तर असे की दैनिक लोकाशा यांचा एकोणिसावा वर्धापन दिनाचे निमित्ताने बीड येथे लोकाशा परिवाराच्या वतीने विविध क्षेत्रात काम केलेल्या नऊ मान्यवरांना नवरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले यामध्ये भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलालजी मुथा यांचा समावेश होता याप्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी सांगितले की राज्यात व राज्याबाहेर जेव्हा जेव्हा नैसर्गिक आपत्ती आली यामध्ये लातूर धाराशिव मधील भूकंप असेल गुजरात मधील भूकंप असेल नैसर्गिक आपत्तीमध्ये निराधार झालेल्या व आई-वडिलांचा छत्र हरवलेल्या मुलांना यांनी मायेचा हात देत त्यांना भरभक्कम आधार देऊन त्यांचे पालकत्व स्वीकारले.

तर राज्यात ज्या ज्या भागात शेतकऱ्यांनी कर्जापाई आपली जीवन यात्रा संपवली त्या त्या निराधार मुलांना व मुलींना शांती भाऊंनी मदतीचा हात देत त्यांचे पालकत्व स्वीकारून त्यांच्या शिक्षणाची राहण्याची सर्व सोय पुणे येथे केली तर राज्यात गाळ मुक्त धरण गाळ युक्त शिवार योजनेत त्यांचा सिंहाचा वाटा असून सन 2018मध्ये बुलढाणा जिल्ह्यात त्यांनी ना भूतो न भविष्यती असे जलसंधारणाचे काम करून या जिल्ह्यात हरितक्रांती निर्माण करण्यासाठी त्यांनी मोलाचे काम केलेले आहे खरोखरच माझ्या हातून या मान्यवरांचा नवरत्नांचा सन्मान होत आहे याचे मला अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले कार्यक्रमास पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे लोकाशाचे संपादक विजयकुमार बंब BJS चे शांतीलाल मुथा आदी मान्यवर उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये