ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देऊळगाव राजा येथील दोन हार्डवेअर दुकाने फोडली 

60 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा येथील जालना रोडवरील नवा मोंढा समोरील दोन हार्डवेअर दुकाने मध्यरात्री फोडून 60 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना 2 एप्रिल रोजी रात्री घडली.

सविस्तर वृत्त असे की, जालना रोडवरील जगदंबा हार्डवेअर चे शटर चे कोंडे तोडून दुकानात प्रवेश करून अज्ञात व्यक्तींनी -01) तार बंडल एकुण 10 नग अंदाजे किंमत- 10,000 रु. 02) बायंडींग ताराचे 04 बंडल किंमत अंदाजे 16,000/- रु. 03) गेट व्हिल लोक किंमत अंदाजे – 3,000 – रु.4) होलड्राप सेट 100 नग किंमत अंदाजे – 5.000 .05) इलेक्ट्रीक वजन काटा किंमती अंदाजे 5000 रु.06.झाडू अंदाजे 15 नग किमती अंदाजे 500/- रु. 07) 03×06 फिट दरवाजा पत्रा 04 नग किंमत अंदाजे-2,000/-रु.08) इलेक्ट्रीक मोठ्या वजन काट्याचे मिटर किन्त संवाजे – 1.500/- रु. 09) गल्यातील नगदी – 1,500 – रु असे एकुण 44,500/- रुपयाचा हार्डवेअरचा माल लंपास केला.तसेच अरुण कोल्हे याचे दुकानातील 01) एक टेक्समो कंपनीचे 3hp मोटर जुनी किमती अंदाजे 2,500/- रु. 02)3×5 लोखंडी खिडकी की अंदाजे- 2,000/- रु. 03) हॅमर ड्रिल एक नग किमती अंदाजे1000/-4)हेन्ड ग्रेडर एक नग किंमती अंदाजे- 2,000/- रू एक लोखंडी बाज किंमत अंदाजे 1,000 रू

06) शक्ती कंपनीची वेल्डिंग मशिन वयारसहित की अंदाजे 7000 – रु.असा एकुण् 15500 रू,दोन्हीं दुकानातून एकूण 60000/- चा मुद्देमाल लंपास केला आहे

   चोरीची फिर्याद विनायक रामकिसन अनपट रा पिंपळगाव यांनी पोलिस ठाण्यात दिली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास विनोद गवई करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये