ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रेल्वे स्टेशन परिसरात तान्हा पोळा उत्साहात साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेंद्र मर्दाने

 रेल्वे स्टेशन परिसरातील व्यापारी मंडळ तान्हा पोळा उत्सव समिती व २४ तास सेवा ग्रुप वरोराच्या संयुक्त विद्यमाने तान्हा पोळा थाटामाटात साजरा करण्यात आला. कार्यक्रमात बालगोपाळांची लगबग होती. अनेक बालके सुंदर वेशभूषेत नंदीला सजवून उपस्थित होते.

बक्षीस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी नगराध्यक्ष अहतेशाम अली यांनी भूषविले. होते यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक संगीता लोंढे, रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. सागर वझे, सामाजिक कार्यकर्ते तथा माजी नगरसेवक छोटूभाई शेख भाजपाचे युवा नेते करण देवतळे, सामाजिक कार्यकर्ते बंडू लभाने आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. स्पर्धेत प्रिक्षा शिरसागर,सर्वेश कुकरेजा, श्रीधर देंगे, यांना क्रमशः प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.सोबतच दया शेंडे ,रुद्राक्ष शिरसागर वंश जुमडे, डी.पी. केशवानी, प्रवीण पराते, रिदम चौधरी, आदित्य मिश्रा, भाविक पोले, ऋषिकेश राऊत, रिया देवतळे, तनुष मांडवकर, इ.ना आकर्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले. या स्पर्धेत परीक्षक म्हणून उज्वला खिरटकर, रेखा झाडे भारती लखमापूरे, साबिया खान यांनी काम पाहिले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक गुरुदेव जुमडे यांनी केले. संचालन आरती रोडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजकांनी अथक परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये