मांगली शेतशिवारातून शेतकऱ्यांच्या कृषी पंप केबलची चोरी
भद्रावती पोलिसात तक्रार दाखल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती तालुक्यातील मांगली येथील शेत शिवारातून नऊ शेतकऱ्यांच्या कृषी पंपांच्या केबलची अज्ञात चोट्यांकडून चोरी करण्यात आल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. सदर घटना मांगली शेतशिवारात दिनांक 16 ला सकाळी उघडकीस आली. याबाबत शेतकऱ्यांनी भद्रावती पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
केबलची चोरी झाल्यामुळे या शेतकऱ्यांचे कृषी पंप बंद पडले असून त्यांच्यासमोर अडचणी निर्माण झालेल्या आहेत. शिवारातील प्रभाकर पारधी यांचे २५ फूट, चिंतामणी तेलंग यांचे ७० फूट, रवी खापने यांचे ४० फूट, सचिन ताजने यांचे १३० फूट, श्रीकांत खापने यांचे ३० फूट, विठ्ठल बोथले यांचे २० फूट, आण्याजी देठे यांचे २० फूट तर शंकर नांदे या शेतकऱ्याचे ५० फूट कृषी पंपाचे केबल चोरीला गेले आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून घटनेचा पुढील तपास ते करीत आहे.