जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाढोणा तांडा येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
जिल्हा परिषद प्राथमिक वस्ती शाळा वाढोणा तांडा न 1 येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यात आला ध्वजारोहण, सहकार महर्षी स्वर्गीय भास्कर रावजी शिंगणे वाचनालयाचे अध्यक्ष श्री प्रकाश खांडेभराड यांच्या शुभहस्ते संपन्न झाले या कार्यक्रमाला केंद्रप्रमुख श्री गजानन मांटे, मुख्याधापक श्री राजु पवार, श्री गणेश राव आडे, मधुकरराव धुळे, प्रा अशोक डोईफोडे, अंकुश राठोड, बळीराम राठोड, जोधनाईक राठोड, रामधन राठोड,तांड्यावरील प्रतिष्ठित नागरिक, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.
प्रकाश खांडेभराड व प्रा अशोक डोईफोडे यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन चे महत्त्व पटवून दिले, विद्यार्थ्यांनी दर्जेदार शिक्षण घेऊन जीवनात यशस्वी होण्याचे आवाहन केले, गजानन मान्टे यांनी शाळेच्या विकासासाठी गावकऱ्यांनी मदत करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे सांगितले,याप्रसंगी प्रकाश खांडेभराड यांनी शाळेला वृक्ष चे रोप भेट दिले.
कार्यक्रमाचे संचालन राजु पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन गजानन मान्टे यांनी केले.