होमगार्ड कार्यालय बल्लारशाह मार्फत हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र अभियान अंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रशांत रणदिवे
बल्लारपूर : होमगार्ड पथक बल्लारशाह मार्फत १३ सप्टेंबर रोज रविवार ला हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र अभियान अंतर्गत बल्लारशाह पोलीस स्टेशन परिसरात मा. जिल्हा समादेशक तथा अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रपूर श्री. ईश्वरजी कातकडे, प्रशासकिय अधिकारी नंदा सुर्यवंशी केंद्रनायक होमगार्ड कार्यालय चंद्रपूर, श्री. आर.पी. चरडे, पलटन नायक श्री, रमेश राहुड सा.यांच्य मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण चा कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमास मा. एसडीपीओ राजुरा श्री. सुधीर नंदनवार साहेब तसेच पोलीस निरीक्षक बल्लारशाह श्री विपिन एस. इंगळे साहेब तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. मदनजी दिवटे, प्रभारी अधिकारी बल्लारशाह श्री. शिलास के. ढोबळे, अंशकालिन लिपिक श्री. राकेश बी. मानकर, होमगार्ड सैनिक श्री. बंडुजी आगलावे, मंगेश मेश्राम, सुनील भगत, महिला सैनिक सौ. पुष्पा मानकर, सौ. ताई मडचिप, सौ. सुलोचना धोटे हे कार्यक्रमास उपस्थित होते.