चोरीच्या दोन मोटार सायकलसह दोन आरोपीतां ताब्यात घेऊन दोन गुन्हे उघड
स्थानिक गुन्हे शाखा, वर्धाची कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक 16/09/2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखा वर्धा चे पथक पोलीस स्टेशन हिंगणघाट परिसरात गुन्हेगार चेक करीत असतांना गोपनीय माहिती प्राप्त झाली की दोन इसम मोटार सायकल विक्री करता ग्राहक शोधत आसल्याचे मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी नामे 1) शुभम सुभाष मिसाळ, वय 30 वर्ष, रा. संत कबीर वार्ड हिंगणघाट, तह. हिंगणघाट, जि. वर्धा, 2) आकाश उर्फ काल्या देविदास भोस्कर, वय 32 वर्ष, रा. शास्त्री वार्ड, हिंगणघाट, ह.मु. संत कबीर वार्ड हिंगणघाट, तह. हिंगणघाट, जि. वर्धा यांना ताब्यात घेऊन मोटर सायकल चोरीबाबत सखोल विचारपूस केली असता त्यांनी पोलीस स्टेशन अल्लीपुर, जिल्हा – वर्धा व राळेगाव, जिल्हा यवतमाळ अशा दोन परिसरातून दोन मोटर सायकल चोरी करून आणल्याचे सांगितल्याने त्याचे ताब्यातुन 1) पोलीस स्टेशन अल्लीपुर, जिल्हा – वर्धा येथील अप क्र. 482/2025, कलम :- 303 (2), 3(5) भारतीय न्याय संहिता चे गुन्ह्यातील चोरी गेलेली हिरो होंडा स्प्लेंडर मोटर सायकल क्रमांक एम. एच. 49 ए सी 7820 किंमत 60,000/- रु. व 2) पोलीस स्टेशन राळेगाव, जिल्हा – यवतमाळ येथील अप क्र. 283/2025 कलम :- 303 (2), 3(5) भारतीय न्याय संहिता चे गुन्ह्यातील चोरी गेलेली हिरो होंडा कंपनीचे फॅशन प्रो मोटर सायकल क्रमांक एम. एच. 29 ए जे 3520 किंमत 60,000/- रु. एकूण जु. कि. 1,20,000/- रू. चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्या. दोन्ही आरोपी व दोन्ही गुन्ह्यातील मोटर सायकल पुढील तपासाकरीता पोलीस स्टेशन अल्लीपुर त्यांचे ताब्यात देण्यात आले.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक मा. श्री. अनुराग जैन सा., अपर पोलीस अधिक्षक मा. श्री. सदाशिव वाघमारे सा., स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा चे पोलीस निरीक्षक मा.श्री. विनोद चौधरी सा यांचे निर्देशाप्रमाणे पो.उपनि. प्रकाश लसुंते , स.फौ. मनोज धात्रक, शेखर डोंगरे, पो.हवा. महादेव सानप, पवन पन्नासे, अक्षय राऊत, विकास मुंडे, पो.अ. विनोद कापसे, शुभम राऊत , सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.