ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अपुऱ्या पुलाच्या बांधकामासाठी गावकऱ्यांची नंदोरी ते तहसील कार्यालय भद्रावती पर्यंत पैदल यात्रा

बैलबंडीसह गावकरी व शेतकरी होणार सहभागी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

भद्रावती  तालुक्यातील नंदोरी ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या इंदिरानगर -नंदोरी दरम्यान असलेल्या नदिवर गेल्या अनेक वर्षांपासून पुलाचे काम अर्धवट स्वरुपात असल्याने इंदिरानगर येथील गावकऱ्यांना नंदोरीला येण्यासाठी पावसाळ्यात नदिच्या पाण्यातुन पायी यावे लागत असल्याने गावकऱ्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.

अनेक निवेदने देऊनही या पुलाचे बांधकाम पुर्ण झाले नाही त्यामुळे या पुलाचे बांधकाम त्वरीत करण्यात यावे यासाठी नंदोरी येथील गावकऱ्यांतर्फे दिनांक १८ ला सकाळी नंदोरी ते भद्रावती तहसील कार्यालय अश्या पैदल यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

या यात्रेत गावकरी व शेतकरी आपल्या बैलबंडीसह सहभागी होणार आहे.या यात्रेच्या माध्यमातून सदर समस्या चव्हाट्यावर आणण्यात येणार आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये