ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मनपात प्रबोधनकार ठाकरे जयंती साजरी

चांदा ब्लास्ट

शव सीताराम उर्फ प्रबोधनकार ठाकरे हे थोर समाजसुधारक, ख्यातनाम पत्रकार आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील एक प्रमुख नेते होते असे प्रतिपादन उपायुक्त मंगेश खवले यांनी केले. चंद्रपूर महानगरपालिकेच्या वतीने केशव सीताराम उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मनपा मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये त्यांच्या प्रतिमेस उपायुक्त मंगेश खवले व उपायुक्त संदीप चिद्रवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.

   या कार्यक्रमास उपायुक्त संदीप चिद्रवार,नगरसचिव नरेंद्र बोबाटे,प्रदीप पाटील, विलास बेले,संजय टिकले,वासंती बहादूरे,ग्रेस नगरकर,सुनंदा खनके,गुरुदास नवले,अरुण कुळमेथे,अनिल वाकोडे,संजय चौधरी,प्रशांत गाडगीलवार,मनोज चव्हाण,बंटी बीरिया,इम्रान शेख,शुभम तुंडूलवार आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना उपायुक्त यांनी प्रबोधनकार ठाकरे हे लोकहितवादी नेते, ख्यातनाम लेखक व इतिहास संशोधक होते असे सांगितले.

   तसेच त्यांनी सारथी, लोकहितवादी व प्रबोधन या नियतकालिकांच्या माध्यमातून आधुनिक विचारांचा प्रचार प्रसार केला. अनेक साहित्य संपदांची निर्मिती केली. अंधश्रद्धा, अन्याय्य रूढींना सतत विरोध केला. त्यासाठी त्यांनी वक्तृत्व, लेखन आणि प्रत्यक्ष कृती या तीन मार्गाचा अवलंब केला असे सांगून संयुक्त महाराष्ट्र चळवळीसाठी प्रबोधनकार ठाकरे यांनी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील, असेही उपायुक्त मंगेश खवले म्हणाले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये