एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठात ‘पोस्टर मेकिंग स्पर्धेचे’ आयोजन
आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचा उपक्रम

कार्यक्रमाचे उद्घाटन बल्लारपूर आवाराचे संचालक डॉ. राजेश इंगोले यांच्या हस्ते झाले. स्पर्धेच्या परीक्षक म्हणून इंटिरिअर डिझाइन विभागाच्या सह-प्राध्यापिका अश्विनी वाणी व विवेक पाटील यांनी काम पाहिले.
यात एकूण ११ कनिष्ठ महाविद्यालयांतील २२ विद्यार्थिनींनी उत्साहाने सहभाग घेतला.
द्वितीय पारितोषिक : अवनी ढवस (नारायण विद्यालय, चंद्रपूर)
तृतीय पारितोषिक : रिद्धी तडसे (आदित्य बिर्ला पब्लिक स्कूल)
बक्षीस वितरण समारंभात प्रमुख अतिथी म्हणून संजोग मेंढे, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, बल्लारपूर उपस्थित होते. अध्यक्षस्थानी डॉ. राजेश इंगोले, तर मंचावर डॉ. बाळू राठोड (सहायक कुलसचिव) आणि डॉ. वेदानंद अलमस्त (समन्वयक) उपस्थित होते.
यावेळी बोलताना संजोग मेंढे यांनी विद्यार्थिनींच्या कलात्मक सादरीकरणाचे कौतुक करून, “डिजिटल माध्यमांचा केवळ वापर न करता त्यामागील प्रक्रिया समजून घेणे आणि नाविन्यपूर्ण विचारांना वाव देणे आवश्यक आहे,” असे मत व्यक्त केले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. राजेश इंगोले म्हणाले की, “आजच्या तंत्रज्ञानप्रधान युगात डिजिटल साक्षरता ही काळाची गरज असून विद्यार्थिनींनी त्याद्वारे अधिक सक्षम होणे आवश्यक आहे.”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रद्धा किन्नाके यांनी केले. संचालन सह-प्राध्यापिका निहारिका सातपुते यांनी केले, तर आभार प्रदर्शन सह-प्रा. मोहित पावडे यांनी मानले. सर्व सहभागींना प्रमाणपत्र देण्यात आले. या प्रसंगी स्पर्धक विद्यार्थिनी, त्यांचे शिक्षक, तसेच विद्यापीठाचे प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.