ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पृथ्वीराज झाडे यांची DBT-JRF व UGC-NET-JRF परीक्षेत दैदिप्यमान कामगिरी.!

गोजोलीच्या सुपुत्राने मेहनत, जिद्द आणि सातत्याच्या जोरावर मिळवले दुहेरी यश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.राजेश डोंगरे

गोंडपिपरी तालुक्यातील गोजोली येथील पृथ्वीराज रमाजी झाडे यांनी आपल्या अथक मेहनत, जिद्द आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या जोरावर एकाच वर्षात दोन मोठ्या शैक्षणिक यशांना गवसणी घातली आहे. त्यांनी आपल्या पहिल्याच प्रयत्नात DBT-JRF (2026) तसेच त्यानंतर UGC-NET-JRF (2026) ही पात्रता संपादन करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

ग्रामीण भागातून शिक्षण घेत असताना उपलब्ध मर्यादित साधनसुविधांवर मात करत पृथ्वीराज यांनी स्पर्धात्मक परीक्षेची सातत्याने तयारी केली. अभ्यासातील सातत्य, योग्य नियोजन, कठोर परिश्रम आणि ध्येयाप्रती असलेली जिद्द यांच्या बळावर त्यांनी हे यश मिळवले. विशेष म्हणजे एकाच वर्षात दोन प्रतिष्ठेच्या परीक्षांमध्ये यश मिळवणे, ही त्यांच्या मेहनतीची आणि शैक्षणिक गुणवत्तेची प्रचिती देणारी बाब ठरली आहे.

पृथ्वीराज झाडे यांच्या या यशामुळे गोजोली गावाच्या शैक्षणिक क्षेत्रातील लौकिकात भर पडली असून परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही मोठी प्रेरणा मिळणार आहे.

या यशाबद्दल पृथ्वीराज झाडे यांचे कुटुंबीय, मित्रपरिवार, शिक्षक तसेच ग्रामस्थांकडून मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे. भविष्यात संशोधन व शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेत समाजासाठी योगदान द्यावे, अशा शुभेच्छाही त्यांना देण्यात येत आहेत.

“मेहनत, जिद्द आणि सातत्य असेल तर ग्रामीण भागातील विद्यार्थीही राष्ट्रीय स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण करू शकतो,” हे पृथ्वीराज झाडे यांच्या यशाने अधोरेखित केले आहे. त्यांच्या या दुहेरी यशाकडे परिसरातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण म्हणून पाहिले जात आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये