ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नागरिकांच्या सुरक्षिततेकरिता चंद्रपूर पोलिसांचा “सुरक्षा मंत्र”

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

नागरिकांची सुरक्षितता आणि समाजातील कायदा-सुव्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने चंद्रपूर पोलिसांनी ‘सुरक्षा मंत्र’ या माध्यमातून नागरिकांना विविध सुरक्षा उपायांची माहिती दिली आहे. ‘आपली सुरक्षा – आपला अधिकार’ या संदेशातून प्रत्येकाने स्वतःच्या सुरक्षेबाबत सजग राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महिला व मुलींच्या सुरक्षेसाठी स्वसंरक्षणाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले असून, संकटाच्या प्रसंगी घाबरून न जाता धैर्याने परिस्थितीचा सामना करण्याचा संदेश देण्यात आला आहे. तसेच बाल लैंगिक शोषणापासून मुलांचे संरक्षण, अनोळखी व्यक्तींपासून सावध राहणे आणि संशयास्पद प्रकार आढळल्यास तत्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

वाहतूक सुरक्षेबाबतही पोलिसांनी नागरिकांना महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत. हेल्मेटचा वापर, सीट बेल्टचा वापर, वाहतूक नियमांचे पालन, वाहन चालविताना मोबाईलचा वापर टाळणे तसेच मद्यपान करून वाहन न चालविणे, या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी मदतीसाठी पोलिस हेल्पलाइन 112, महिला हेल्पलाइन 181, बाल हेल्पलाइन 1098 आणि सायबर क्राईम हेल्पलाइन 1930 या क्रमांकांवर संपर्क साधावा, अशी माहिती चंद्रपूर पोलिसांनी दिली आहे.

‘निडर मुलगी – सुरक्षित समाज, सुरक्षित समाज – सक्षम भारत’ या संदेशातून महिला, बालक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिस प्रशासनासोबत नागरिकांनीही जबाबदारीने सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये