ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दलित मित्र वि. तू. नागपुरे अध्यापक विद्यालयाचा गुणवत्तेचा ठसा

दहा विद्यार्थ्यांची जिल्हा परिषद शिक्षकपदी निवड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

गोंडपिपरी येथील दलित मित्र वि. तू. नागपुरे अध्यापक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपल्या गुणवत्तेची आणि मेहनतीची छाप उमटवत जिल्हा परिषद चंद्रपूर व गडचिरोली येथील प्राथमिक शिक्षक पदासाठी निवड होण्याचा मान मिळविला आहे. या यशामुळे अध्यापक विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून परिसरातून विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

अध्यापक विद्यालयातील धीरज पुलगमकर, उज्ज्वला ब्राम्हणकर, समीर आवारी, रितिक पोटे, सुपिया पुलगमकर, पल्लवी कोल्हे, अश्विनी ढवस, अश्विनी येलमुलें, स्नेहल हिवरकर आणि सोनी धानोरकर या विद्यार्थ्यांची जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक पदासाठी निवड झाली आहे.

ग्रामीण व सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षक होण्याचे स्वप्न साकारण्यासाठी योग्य मार्गदर्शन, शैक्षणिक वातावरण आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांची जोड मिळाल्यास यश निश्चित मिळते, हे या विद्यार्थ्यांनी आपल्या कामगिरीतून दाखवून दिले आहे. शिक्षक पदाची निवड प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करून त्यांनी आपल्या कुटुंबासह विद्यालयाचे नावही उज्ज्वल केले आहे.

या यशामागे विद्यार्थ्यांची मेहनत, जिद्द आणि शिक्षकांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल प्राचार्य माधुरी सरोदे, प्राध्यापक विलास खामणकर, दिलीप गजभिये, कमल हिरादेवे, स्वाती कारडवार व शिक्षकेतर कर्मचारी भाऊराव गोरकर, रणवीर धुडसे, राकेश दुर्गे, आनंदराव झाडे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

गोंडपिपरीच्या अध्यापक विद्यालयातून शिक्षक घडविण्याची परंपरा कायम असून, या यशामुळे परिसरातील विद्यार्थ्यांमध्येही शिक्षक होण्याची प्रेरणा निर्माण झाली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये