ताज्या घडामोडी

चंद्रपुरात साजरा होणार पोइला बैसाख उत्सव

बंगाली नववर्ष दिनानिमित्य सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

नुकताच मराठी नववर्ष दिन म्हणजेच गुढीपाडवा संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भारत हा उत्सवप्रिय देश असल्याने तसेच भारतात वेगवेगळ्या संस्कृतींचे जगावेगळे मिलन झाले असल्याने देशभरात वर्षभर विविध उत्सवांची परंपरा आहे व भारतीय सर्व उत्सव मोठ्या जल्लोषात साजरे करत असतात.

भारतीय संस्कृतीप्रमाणे विविध भाषिक नागरिकांचे नववर्ष देखिल वेगवेगळ्या तिथींना येत असते यंदा बंगाली भाषिकांचे नववर्ष 15 एप्रिलला साजरे करण्यात येत असुन बंगाली नववर्षाला पोइला बैसाख असे संबोधण्यात येते. हा दिवस सर्व प्रकारचे शुभ कार्य करण्यासाठी योग्य मुहूर्ताचा असल्याची बंगाली नागरिकांची भावना आहे. यादिवशी लग्न कार्य, गृहप्रवेश असे विविध कार्यक्रम बंगाली समाजाच्या वतीने करण्यात येते.

बंगाली समाज नवं वर्षाच्या निमित्ताने चंद्रपूर येथे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात गीत-गायन, नृत्य स्पर्धा, कविता, समाजासाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या नागरिकांचा सत्कार राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

शहरातील मयूर हॉटेल समोरील इंडस्ट्रीयल एरिया मैदानात सायंकाळी 6 वाजल्यापासून सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी आयोजित केली असून सदर कार्यक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येत आपली उपस्थिती दर्शवावी असे आवाहन आयोजक मनोज पाल ह्यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये