पंचायत समिती सभागृह, कोरपना येथे तालुका प्रशासनाची आढावा बैठक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
आज कोरपना येथील पंचायत समिती सभागृहात माझ्या अध्यक्षतेखाली तालुका प्रशासनाची आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी तालुक्यातील विविध प्रशासकीय विभागांचा विभागप्रमुखांकडून सविस्तर आढावा घेतला.
प्रसंगीच, तालुक्यातील अनेक प्रलंबीत प्रश्नांना मार्गी लावण्यासह रखडलेली विकासकामे लवकरात लवकर पुर्ण करण्याच्या अधिकाऱ्यांना सुचना ही केल्या.
कोरपना हा आदिवासीबहुल तालुका आहे. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारच्या विविध घटकांसाठी असलेल्या लोककल्याणकारी योजनांची सर्वदूर प्रचार-प्रसिद्धी व्हावी तसेच सुरू असलेल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होईल याकरता सर्वांनी लक्ष घालावे असेही यादरम्यान सांगितले.
तालुक्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेत मोठा घोळ असून यासंदर्भात तातडीने सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशा सुचना जिल्हाधिकारी तसेच सचिवांना केल्या. दरम्यानच तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मागील डिसेंबर महिन्यापासून शालेय पोषण आहार मिळत नसल्याचे लक्षात आले; तत्क्षणीच शालेय शिक्षणमंत्री ना. दादा भुसे जी यांना भ्रमणध्वनी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची विनंती केली.
कोरपना तालुक्यात सेवा देणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कर्तव्याची जाण ठेवून सेवाभाव जोपासत काम करावे. जनतेची हेळसांड होईल असे वर्तन करू नये. विकासाच्या बाबतीत शासनस्तरावर कोणतीही अडचण भासल्यास पाठपुरावा करण्यासाठी मी नेहमी सोबत आहे. असेही यावेळी आवर्जून सांगितले.
या बैठकीला माझ्यासमवेत संवर्ग विकास अधिकारी पेंदाम, नायब तहसीलदार प्रविण चिडे, नायब तहसीलदार वासेकर मॅडम, मुख्याधिकारी धुमाळ, पोलीस निरीक्षक कदम, पोलीस निरीक्षक राजपुत, सर्व विभागप्रमुख, माजी पं. स. सभापती संजय मुसळे, भाजपचे तालुका महामंत्री सतिश उपलेंचवार, अरूण मडावी, महेश देवकते, अमोल आसेकर, आबिद अली, किशोर बावणे, अरूण डोहे, प्रमोद कोडापे, विजय रणदिवे, पुरुषोत्तम भोंगळे, शशिकांत आडकिणे, आशिष ताजने, अमोल पानघाटे आदिंसह तालुक्यातील विभागवार अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.