ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महानाट्य २ मार्चला भद्रावतीत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

  संविधानाच्या ७५ व्या अमृत महोत्सवानिमित्त संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या त्याग व संघर्षाची गाथा महानाट्याचे आयोजन दि.२ मार्चला ऐतिहासिक विजासन बुद्ध लेणी येथे सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आले आहे.

   महाराष्ट्रातील या नाटकाचा दुसरा प्रयोग आहे. प्रस्तुती अभुदय आर्ट अकॅडमी नलगोंडा, तेलंगाना यांची आहे.

महाविदर्भ भिक्षु संघ व वर्षावास आयोजन समिती तर्फे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी ज्ञानात भर पडावी व त्यांना योग्य मार्गदर्शन व्हावे. याकरीता ऐतिहासिक बुद्ध लेणी विजासन येथे भव्य अभ्यासिका उभारण्यात आली आहे. या अभ्यासिकेची मदत म्हणून महानाट्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे आयोजन समितीने घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महानाट्य कार्यक्रमाचे उद्घाटक खासदार प्रतिभा धानोरकर, प्रमुख अतिथी आमदार करण देवतळे उपस्थित राहणार आहे.

महानाट्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रस्तुतीचा आनंद घेण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजन समितीचे जयदेव खाडे, विनयबोधी डोंगरे, सुरज गावंडे,प्रियवंद वाघमारे, धर्माजी गायकवाड, छाया कांबळे, लिनता जुनघरे, शालिनी गोडघाटे, शिला खाडे आदींनी बुद्ध लेणी परिसरात घेण्यात आलेल्या पत्रपरिषदेत केले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये