शहरात मुस्लिम बांधवांतर्फे रमजान ईद ऊत्साहात साजरी
ईदगाह येथे पवित्र नमाज अदा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
शहरातील मुस्लिम समाज बांधवांतर्फे रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ईद सणाचेऔचित्य साधून शहरातील मुस्लिम बांधवांनी शहरातील ईदगाह व मज्जिद येथे दिनांक 31 रोज सोमवारला सकाळी नऊ वाजता पवित्र नमाज अदा केली.
यावेळी जामा मज्जिदचे इमाम अब्दुल गफार अन्सारी यांनी सर्व मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देऊन पवित्र मार्गदर्शन केले. यावेळी मुस्लिम बांधवांनी एकमेकांची गळाभेट घेऊन एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या या पवित्र रमजान महिन्यात मुस्लिम बांधवां तर्फे रोजा पाळण्यात आला.
महिन्याच्या अखेरीस शहरात अनेक ठिकाणी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले. यावेळी मुस्लिम बांधवांनी भाईचाराचा संदेश देत ईद सण शांततेत साजरा केला. यावेळी जामा मज्जीदचे अध्यक्ष हाजी बबन शेठ, हाजी जावेद शेठ, गरीब नमाज मज्जिदचे इमाम हाफिज मुजमील तथा अन्य मुस्लिम बांधव उपस्थित होते.