ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

२१ जानेवारीला वरोरा शहरात “विकसित भारत संकल्प यात्रा”

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेंद्र मर्दाने

वरोरा : भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या अनुषंगाने रविवार, दिनांक २१ जानेवारी २०२४ रोजी वरोरा शहरात “विकसित भारत संकल्प यात्रा” कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

     प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ही मोहीम देशभरात राबविण्यात येत आहे. लाभार्थ्यांपर्यंत शासकीय योजनेची माहिती व प्रत्यक्ष लाभ पोहचने गरजेचे आहे. त्यासाठी या यात्रेद्वारे केंद्र शासनाच्या कल्याणकारी योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी चित्ररथाच्या व्हेनमधून शासकीय योजनेचे प्रबोधन करण्यात येईल.

      कार्यक्रमाच्या अंतर्गत वरोरा शहरात रविवारी सकाळी ९ ते१२ वाजेपर्यंत स्थानीय महात्मा गांधी उद्यान आणि दुपारी २ ते ५ वाजेपर्यंत नगर परिषद कार्यालयात “विकसित भारत संकल्प यात्रा” संदर्भात पी. एम.स्वनिधी, प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत मिशन (शहरी) इत्यादी योजनांची माहिती देण्यात येणार आहे. सर्व वरोराकर नागरिकांनी या संकल्प यात्रेचा लाभ घ्यावा, असे आवाहन वरोरा नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी गजानन भोयर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये