ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

डाॅ. खानखोजे यांचे विचार तरूणांमध्ये रुजविण्याची गरज – इमरान राही

22 वी 'इतिहास प्रश्न म॔जुषा स्पर्धा' संपन्न 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

‘आज आपल्या देशासमोर आतंकवाद, भ्रष्टाचार, रोजगार व देशभक्तीचा अभाव या सारख्या महत्वाच्या समस्या असून यावर मात करण्यासाठी समर्पित, देशप्रेमाने भारावलेली व कर्तव्यदक्ष नवी पिढी निर्माण करण्याची गरज आहे. डाॅ. पांडुरंग सदाशिव खानखोजे यांनी आपले संपूर्ण जीवन देशकार्यासाठी बहाल केले. त्यांच्या पाऊलावर पाऊल टाकण्याकरीता डाॅ. खानखोजे यांचे विचार तरूणांमध्ये रुजविण्याची नितांत गरज आहे, असे प्रतिपादन समाजसेवक इमरान राही यांनी स्थानिक एस.एस.एन.जे.महाविद्यालयातील सभागृहात आयोजित इतिहास प्रश्न म॔जुषा स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात 18 जानेवारी रोजी केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ.प्रभाकर ढाले तर प्रमुख अतिथी म्हणून पोलीस उपनिरीक्षक सुमित कांबळे, राजू लभाणे, राजेश धोपटे, प्रा. विवेक देशमुख, प्रा. स्वाती पातुरकर व इतिहास अभ्यास कॅप्टन मंडळाचे सचिव कॅप्टन मोहन गुजरकर उपस्थित होते.

क्रांतिकारक डाॅ. पांडुरंग सदाशिव खानखोजे स्मृती संस्था व इतिहास अभ्यास मंडळ, एस.एस.एन.जे. कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने वर्ग 12 वी.च्या इतिहास या विषयावर 22 वी. आंतरमहाविद्यालयीन ‘इतिहास प्रश्न मंजुषा’ स्पर्धा संपन्न झाली. यात 9 कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

कार्यक्रमाची सुरुवात ‘हम युवा प्रहारी हम बढे चलो……’ देशभक्तीपर गीताने झाली. कॅप्टन मोहन गुजरकर यांनी डाॅ. पांडुरंग सदाशिव खानखोजे यांच्या जीवनातील प्रेरक प्रसंग यावेळी आपल्या प्रास्ताविक भाषणात सांगितले.

सदर प्रश्न म॔जुषा स्पर्धेत यशवंत कनिष्ठ महाविद्यालय वर्धेच्या सार्थक नरांजे व कु. तनुजा गव्हाळे यांच्या संघाने रू.2002/- चा प्रथम पुरस्कार, देवळीच्या एस.एस.एन.जे.महाविद्यालयाच्या यांच्या संघातील रूचिका काबंळे व प्रिती मेश्राम यांना रू 1501/- तर भारत कनिष्ठ महाविद्यालय, वेळा, हिंगणघाट च्या संघातील साक्षी मुते व पुजा झाडे यांनी रू. 1001चा तृतीय पुरस्कार पटकाविला.

रू. 500/- चे प्रोत्साहनपर पुरस्कार यशवंत कनिष्ठ महाविद्यालय, सेलू, न्यु इंग्लिश कनिष्ठ महाविद्यालय, वर्धा,

यशवंत कनिष्ठ महाविद्यालय नाचनगाव, जनता कनिष्ठ महाविद्यालय, देवळी, यशवंत कनिष्ठ महाविद्यालय, वायगांव व यशवंत कनिष्ठ महाविद्यालय, मांडगाव यांना देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रा. जगदीश यावले तर आभार प्रा. ममता पिलेवान यांनी मानले.

यशस्वीतेकरीता आसिफ शेख, शेखर भोगेकर, प्रतीक क्षीरसागर, अक्षय जबडे, प्रा. विनोद मेंढे, प्रा. गिरीश काळे, प्रा. पंकज दांडेकर, प्रा. विजय भजभुजे, प्रा विजय चव्हाण, राखी खोडे, सुप्रिया यादव व इतिहास अभ्यास मंडळाच्या स्वयंसेवकांनी प्रयत्न केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये